जब्बार चीनी, वणी: वणीत आज एक व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह आढळून आली आहे. ही व्यक्ती पोलीस विभागातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर व्यक्ती छोरिया टाउनशिप येथील असून त्यांना कुठून कोरोनाची बाधा झाली हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र आता कोरोना सर्वसामान्यांवरून अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तींकडे वळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आजच्या रुग्णामुळे वणीत कोरोनाचे एकूण रुग्ण 63 झाले आहेत.
आज वणीतून 39 जणांचे स्वॅब यवतमाळ येथे पाठवण्यात आले. हे रिपोर्ट उद्या किंवा परवा येतील. तर आज 53 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात एक व्यक्ती पॉजिटिव्ह आली आहे. ही व्यक्ती छोरिया टाऊनशिप येथील असून पोलीस विभागात कार्यरत आहे.
सदर व्यक्ती ही 5 ऑगस्टला यवतमाळ येथे गेली होती. तिथून परत आल्याच्या 2-3 दिवसानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांनी सुट्टी घेतली. मात्र तेव्हापासून त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. तसेच त्यांना कोरोनाचे लक्षणं असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी आज स्वत:हून कोविड केअर सेन्टर येथे जाऊन रॅपिड ऍन्टिजन टेस्ट केली. त्यात ते पॉजिटिव्ह आढळून आले आहे.
त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचा-यांची उद्या कोरोनाची चाचणी घेतली जाणार आहे. कोरोनाच्या काळातही ऑन ड्युटी चोवीस तास कर्तव्यावर राहणा-या कर्माचा-यांमध्येच आता कोरोनाने शिरकाव केला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
तेली फैल लो रिस्कमध्ये पण रजा नगरने वाढवले टेन्शन
दुसरीकडे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला तेली फैल आता लो रिस्कमध्ये आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र रजा नगरमधली साखळी वाढत असून तिथे कोरोनाचे 7 रुग्ण झाले आहेत. तर त्या परिसरातील 39 रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहेत. सध्या रजा नगर परिसर सिल करण्यात आला असून छोरिया टाउनशिप हा परिसर सिल करण्यास सुरूवात झाली आहे.
सध्या वणी तालुक्यात कोरोनाचे एकूण 63 रुग्ण झाले असून त्यातील 49 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात 12 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. याती यवतमाळ जीएमसी येथे 2 तर 10 रुग्णांवर परसोडा येथील कोविड केअर सेन्टरमध्ये उपचार सुरू आहे.
सध्या वणी तालुक्यात कोरोनाचे एकूण 63 रुग्ण झाले असून त्यातील 49 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात 12 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. याती यवतमाळ जीएमसी येथे 2 तर 10 रुग्णांवर परसोडा येथील कोविड केअर सेन्टरमध्ये उपचार सुरू आहे.