टिळक चौक ते जंगली पीर रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता

विवेक तोटेवर, वणी: टिळक चौक ते जंगली पीर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचल्याने हा रस्ता धोकादायक झाला आहे. त्यामुळे या मार्गावर रोज छोटे मोठे अपघात होत आहे. या रस्त्याचे काम 7 दिवसात सुरू न झाल्यास युवासेना रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या रस्त्याबाबतचे निवेदन 7 जुलै रोजी नगर परिषद प्रशासक व मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.

वणीतील मुख्य व सर्वात वरदळीचा मार्ग म्हणेज टिळक चौक ते दीपक चौपाटी. मागील एक ते दीड वर्षांपासून या मार्गाची चाळणी झाली आहे. त्यामुळे या मार्गावर रोजच छोट्या मोठ्या अपघाताची मालिका सुरू झाली आहे. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्यासाठी निधी हा जानेवारी 2023 आला आहे. परंतु काम मात्र अजूनही सुरू झालेले नाही. या मार्गावर जेव्हा एखादा मोठा अपघात होईल व निष्पाप जीवाचा बळी गेल्यावर रस्ता बांधणीचा मुहूर्त निघणार काय? असा सवाल आता विचारला जात आहे.

पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यात पाणी साचले आहे. परिणामी खड्डा किती खोल आहे याचा अचूक अंदाज वाहन चालकाला बांधता येत नाही. ही बाब गंभीर असून यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी युवासेनेद्वारे निवेदनातून करण्यात आली आहे.

जर निवेदनापासन 8 दिवसात काम पूर्ण न झाल्यास युवासेना हा मार्ग बंद करून युवासेना स्टाईलने रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रशासक व मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतांना युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.