मारेगाव तालुक्यातील 13 शाळा शिक्षकांविना, शिक्षणाचा बट्ट्याबोळ

भास्कर राऊत, मारेगाव: आंतरजिल्हा बदलीमुळे तालुक्यातील शिक्षकाविना ग्रामीण भागातील शाळा बंद होण्याच्या मार्गांवर आहे. सध्या तालुक्यात तब्बल 13 शाळा ह्या शिक्षकांविना आहे. त्यामुळे शाळेत गुरूजीच नसल्याने शाळा ओस पडण्याची शक्यता असून त्यामुळे शिक्षणाची कास धरणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जीवन अंधकारमय होण्याच्या मार्गांवर आहे. याकडे शासन आणि प्रशासन लक्ष देईल काय? याकडे तालुकावासियांचे लक्ष लागलेले आहे.

मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. या तालुक्यामध्ये कर्मचारी यायला तयार होत नाही. तालुक्यामध्ये एकूण 104 शाळा आहेत. या शाळांमध्ये मागील वर्षी 108 शिक्षक कमी होते. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी यांना तारेवरची कसरत करत शाळा चालवाव्या लागल्या. यावर्षी यात काही सुधारणा होईल आणि शाळा सुरळीत चालेल असे वाटत असतानाच तालुक्यातील तब्बल 39 शिक्षकांच्या बदली झाली.

बदली झालेल्या शिक्षणामध्ये 14 शिक्षक हे अंतर्गत जिल्हा बदलीमध्ये दुसऱ्या जिल्ह्यात गेले. तर 25 शिक्षक हे तालुक्याबाहेर गेले. 39 शिक्षक गेल्यानंतर तेवढेच शिक्षक तालुक्यात येण्याची अपेक्षा होती. मात्र केवळ 17 शिक्षक तालुक्यामध्ये आले. तालुक्यामध्ये 329 शिक्षकांची पदे मंजूर असून 208 शिक्षक सध्या कार्यरत आहे. सध्या तालुक्यामध्ये 121 शिक्षकांची कमी आहे.

13 शाळा शिक्षकांविना
तालुक्यातील 104 शाळांपैकी तब्बल 13 शाळा ह्या शिक्षकांविना आहे. यात मेंढणी, कानडा, मुकटा, वेगाव, केगाव, मांगली, टाकली, रामेश्वर, बामर्डा, भालेवाडी, उमरी पोड, महागाव, गाडेगाव या 13 शाळांना एकही शिक्षक नाही. त्यामुळे या शाळांना पर्यायी शिक्षक शोधताना गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडुरवार यांची चांगलीच दमछाक होताना दिसते आहे.

शिक्षकांसाठी पालक पंचायत समितीत
तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने पालक, शिक्षण समिती सदस्य तथा गावकरी हे विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समितीमध्ये चकरा मारताना दिसत आहे. कोणी निवेदने देत आहेत तर कोणी शिक्षक नाही दिला तर आंदोलन करू अशा प्रकारे इशारे देत आहेत.

गटशिक्षणाधिकारी यांची तारेवरची कसरत
तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये शिक्षक पोहोचला पाहिजे अशी तारेवरची कसरत गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडुरवार करीत आहे. यात त्यांनी काही शिक्षकांना या शाळेवरून त्या शाळेवर असे तात्पुरते आदेश काढलेले आहे. या आदेशाला एका शिक्षकाने आव्हान देत थेट एकदिवसीय आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाला जातीय रंग दिला जात असल्याची परिस्थिती तालुक्यामध्ये सद्य परिस्थितीमध्ये दिसून येत आहे.

हे देखील वाचा: 

मित्राच्या बायकोवर नियत फिरली, हनिमून होताच नशा सरली

शेतक-यांनो सावधान… शेतशिवारातील दुचाकीवर चोरट्यांचा डोळा

Comments are closed.