बैठकींना दांडी माराल तर खबरदार !

घरकुल लाभार्थी मेळाव्यात अनेक ग्रामसेवक गायब

0

सुशील ओझा, झरी : प्रधानमंत्री आवास योजना अभियान – २०१९ घरकुल लाभार्थी मेळावा झरी पंचायत समिती सभागृहात झाला. यात अनेक ग्रामसेवकांनी दांडी मारली. त्यामुळे पंचायत समिती सदस्यांसह अनेकांनी आपला रोष व्यक्त केला. त्यांच्यावर कारवाईदेखील करावी अशी मागणी होत आहे.

Podar School 2025

गोरगरीबांना राहण्याकरिता शासनाने घरकुल योजना अमलात आणली. ग्रामपंचायत स्तरावर या योजनेची अंमलबजावणी केली जाते. त्या पातळीवर लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. परंतु लाभार्थी निवडमध्ये मोठा भेदभाव सरपंच व सचिव करीत असल्याची ओरड तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऐकयाला मिळत आहे. याच अनुषंगाने पंचायत समिती सभागृहात गुरुवारी प्रधानमंत्री आवास योजना अभियान – २०१९ घरकुल लाभार्थी मेळावा सभा घेण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ह्या मेळाव्यात सभापती लता आत्राम , उपसभापती नागोराव उरवते, पं.स. सदस्य राजेश्वर गोंड्रावार , गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण , सहा. गटविकास अधिकारी इसलकर , पंचायत विस्तार अधिकारी सांख्यिकी जाधव, शाखा अभियंता वलथरे तसेच तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व घरकुल लाभार्थी ह्या मेळाव्याला उपस्थित होते. घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाबद्दल मोलाचे मार्गदर्शन पं.स. सदस्य राजेश्वर गोंड्रावार यांनी केले. तसेच तालुक्यातील लोकांची समस्या ऐकून घेतल्यात.

ज्या गावातील तक्रारी प्राप्त झाल्यात त्या गावच्या ग्रामसेवकांकडून समस्यांचे निवारण करून घेतले. बैठकीला अनेक ग्रामसेवकंनी ह्या बैठकीला दांडी मारली. ज्यामुळे संतापलेले पं.स सदस्य राजेश्वर गोंदरावर यांनी सदर ग्रामसेवकांना नोटीस देऊन त्यांच्यावर कार्यवाही करा अशा सूचना संबधीत गटविकास अधिकारी यांना दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.