आज वणीत धडाडणार ऍड प्रकाश आंबेडकर यांची तोफ

स. 11 वाजता शासकीय मैदानावर जाहीर सभा

बहुगुणी डेस्क, वणी: वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ आज गुरुवारी दिनांक एप्रिल रोजी स. 11 वाजता पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानावर पक्षप्रमुख ऍड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या सत्ता परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वंचिततर्फे तेली समाजाला प्रतिनिधित्व देत राजेश बेले यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या वेळी वंचित आघाडीच्या उमेदवाराला चांगले मत मिळाले होते. यावेळी वंचितचा जनाधार आणखी वाढेल असा विश्वास वंचितच्या पदाधिका-यांनी व्यक्त केला आहे. ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला मतदारसंघातील मतदारांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वंचितचे जिल्हा अध्यक्ष डॉ निरज वाघमारे, विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, जिल्हा महासचिव मिलिंद पाटील, शिवदास कांबळे, मंगल तेलंग, धम्मवती वासनिक, गौतम दारुंडे, कैलास धोटे, संघापाल कांबळे, प्रशिक मनवर, विलास करमनक, वैशाली गायकवाड, पुष्पा शिरसाट, शारदा मेश्राम, किशोर मुन, अर्चना नगराळे, विशाल कांबळे, अर्चना कांबळे, नंदिनी ठमके आदींनी केले आहे.

Comments are closed.