पॉकेटमनी गोळा करून विद्यार्थ्यांनी दिला मदतीचा हात

वणीतील प्रयास ग्रुपचा स्तुत्य उपक्रम

0

जब्बार चीनी, वणी: कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत अनेक जण मदतीला पुढे आले होते. शासनाने जवळपास ७० ते ८० टक्के नागरिकांना राशन उपलब्ध करून दिले होते. परंतु या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला लॉकडाऊनमुळे घर कसे चालवायचे हा प्रश्न निर्माण झाला. महागाईने उच्चांक गाठला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजंदारीवर गदा आली आहे. गेली काही महिन्यांपासून अनेक नागरिकांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने घरचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न आहे.

अशावेळी त्यांच्या अडचणीत थोडी मदत व्हावी यासाठी प्रयास ग्रुप वणी तर्फे अतिशय वुद्ध, दिव्यांग, अनाथ व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या 30 किटचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रसाय ग्रुप तर्फे एक मदत म्हणून सर्व शिकणाऱ्या मुलांनी एकत्र येऊन पॉकेट मनी जमा केले.

काही दानशूर लोकांनीदेखील प्रयास ग्रुपला मदत केली. त्या सर्व जमा झालेल्या पैशांमधून धान्याची कीट
सर्व मुलांनी मिळून तयार केली. दोन ते तीन दिवस सर्वे करून अत्यंत गरजू कुटुंबाला काही मदत व्हावी या उद्देशाने अतिशय वुद्ध , दिव्यांग, अनाथ व गरजू कुटुंबाला धान्याचे किट वाटप करण्यात आले. सोबतच सॅनिटायझर, मास्क आणि छोट्या मुलांना कपड्यांचेसुद्धा वाटप करण्यात आले.

यावेळी आदित्य चिंडालिया, सागर जाधव, प्रीति कोचेटा, मिताली कोचेटा, प्रियल कोचेटा, रोशनी जैन, शुभम जोबनपुत्रा, ऋषभ मुनोत, अनन्य चिंडालिया इत्यादींनी विद्यार्थ्यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

हेदेखील वाचा

वणी शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, आज अवघा 1 रुग्ण

हेदेखील वाचा

जेव्हा भाजीविक्रेते स्वत:च उलटवतात आपला माल….

हेदेखील वाचा

कोरोना पेशंटसाठी रिलायन्स झाले उदार!

 

Leave A Reply

Your email address will not be published.