सुशील ओझा, वणी: तालुक्यात कोळसा खदान, डोलोमाईट चुना फॅक्ट्री व इतर कंपनी असून या फॅक्ट्रीमध्ये तालुक्यासह बाहेर गावातील शेकडो तरुण युवक काम करीत आहे. तालुक्यातील वरील कंपनीमध्ये शासकीय नियम डावलून कामगारांचा वापर करून घेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नियमाने ८ तासाच्या वर कंपनीत काम करून घेणे म्हणजे शासनाच्या नियमाचे उलनघन आहे. परंतु वरील काही कंपनीमध्ये अत्यल्प पगारावर कामगारांकडून १२ तास काम करून घेत आहे. ८ तासाच्यावर काम केल्यास ओटी म्हणून जास्त पैसा दिला जातो. परंतु वरील काही कंपनीन्या मध्ये १२ तासांच्या दोन शिप्ट चालते व त्यात कामगारांकडून १२ तास काम करून घेताहेत.
कंपनी कामगार मजुरांना २८० रुपये रोज प्रमाणे कमी पेमेंट देऊन १२ तास काम करून घेत आहे. तसेच नियमाने प्रत्येक कामगारांचा अपघात विमा काढणे आवश्यक असताना बहुतांश कामगारांचा विमा काढलेला नाही. कारखान्यात कोळसा, गोटा, पोते, लोखंड, व इतर कारखान्यात लागणारे इतर वस्तू उचलणे व ठेवणे ही कामे कामगारांना करावे लागते. त्याकरिता कंपनीकडून कामगारांना हेल्मेट, चष्मा, जोडे, हॅन्डक्लोज, व इतर संरक्षण किट देने गरजेचे असताना बहुतांश कामगाराना ही सौरक्षण किट दिल्या जात नसल्याचे अनेक कामगारांनी सांगितले आहे.
संरक्षण किट न दिल्यामुळे कामगारांच्या जीविताला निर्माण झाला असून कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. वरील कंपन्यात अनेक लहान मोठे अपघात झाले असुन कंपनीच्या मॅनेजर व इतर अधिकार्यांनी कंपनी पातळीवर उपचार करून प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु वरील कंपनीत एखादा मोठा अपघात किंवा घटना घडल्यास याला जवाबदार कोण असा प्रश्न कामगारांकडून उपस्थित होत आहे. कारण बहुतांश कामगारांचे अपघात विमेच बनविल्या गेले नसल्याची माहिती आहे.
काही कारखान्यात टायरची काळी भुकटीचा वापर केला जात आहे. ज्यामुळे प्रदूषणातही वाढ झाली असून या धुळीचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकावर मोठ्या प्रमाणात होत असून त्याच कारखान्यातील कामगारांना विविध आजार होत असल्याच्या तक्रारी येत आहे. कामगारांचे हात पायापासून तर तोंडात सुद्धा या काळ्या धुळीमुळे तोंडातील थुंक सुद्धा काळेच निघते. कंपनीत कोणतीही घटना किंवा अपघात झाल्यास त्या कामगारांना त्वरित दवाखान्यात नेण्याकरिता कोणत्याही कंपनी किंवा डोलोमाईट मध्ये ऍम्बुलंसशी व्यवस्था सुद्धा नाही. ज्यामुळे कामगारांच्या जीवाचे काय असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.
३ वर्षांपासून मुकुटबन येथील विनोद जंगीलवार नामक युवक हा गणेशपूर येथील डीलाईट केमिकल नामक चुना कंपनीत काम करीत होता. ३ महिन्यांपूर्वी कंपनीत काम करीत असताना चुन्याचा पोता फुटून जंगीलवार याच्या डोळ्यात गेला. ज्यामुळे त्याचा डोळा निकामी झाला परंतु सदर कंपणीने अजूनही त्याला एक रुपयाची आर्थिक मदत केली नाही. ज्यामुळे कंपनीच्या धोरणावर कोण विश्वास ठेवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. जंगीलवार याने कंपनीच्या म्यानेजर तथा मालकांना विनंतीअर्ज करून मदतीची मागणी केली. परंतु आज उद्या करत कंपनी पीडित मुलाला झुलवत आहे.
जंगीलवार याचे अपघात विमासुद्धा काढून नाही हे विशेष. नियमाने वर्कमॅन कम्पेन्सेशन ऍक्ट नुसार अपघात ग्रस्त कामगारांना कंपनीने त्वरित मदत करायला पाहिजे. परंतु कंपनीच्या अडेलतट्टू धोरणामुळे अजूनही अपघातग्रस्त पीडित युवकाला मदत मिळाली नाही. ज्यामुळे पीडित मुलगा कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहे. अडेगाव परिसरातील दोन कंपन्यांनी आठ तास काम करून घेत असल्याची माहिती असून तेथील कामगारांना दिलासा मिळाला असून इतरही कारखाने किंवा कंपनीने सुद्धा आठ तास काम करून घ्यावे अशीही मागणी होत आहे.