अवैधरित्या मुरूम उत्खनन व वाहतूक करणा-यांवर कार्यवाही

तस्करीत वणीाच्या ठेकेदाराचे नाव समोर

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील डोंगरगाव पारधी बेड जवळील तलावातील अवैधरित्या जेसीबीने मुरूम उत्खनण करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करणाऱ्या जेसीबी व ट्रॅक्टर तलाठी यांनी पकडून जप्त केला. सदर ट्र्रॅ्क्टर व जेसीबी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली आहे. सदर तस्करी वणीतील एका ठेकेदाराची असल्याची माहिती समोर येत आहे.

प्राप्त माहिती नुसार 25 जानेवारीला डोंगरगाव येथील तलावातील मुरूम जेसीबीने उत्खनण करून ट्रॅक्टरद्वारे खुलेआम डोंगरगाव ते शिंधिवाढोना रस्त्याच्या कामावर टाकणे सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. माहिती मिळताच तहसीलदार यांनी पटवारी बी. बहुरे यांना मुरूम उत्खनण करीत असलेल्या ठिकाणी पाठवून कार्यवाही करण्यास सांगितले. संध्या 4 वाजता दरम्यान पटवारी डोंगरगाव येथील तलावावर पोहचले असता त्यांना जेसीबीने मुरूम उत्खनन सुरू व ट्रॅक्टरने वाहतूक उरु असल्याचे आढळले.

तलाठी यांनी जेसीबीने होणारे उत्खनन बंद करून जेसीबी क्र एम. एच. २९ ए.के ७७४ व ट्रॅक्टर क्र एम. एच. २९ सी ४५१४ जप्त केले व कुणाच्या मालकीचे आहे असे विचारणा केली. जेसीबी चालक संजय नक्षिने व टॅक्टर चालक संतोष सुरपाम यांनी वणी येथील दिलीप सातपुते यांचे असल्याचे सांगितले. जेसीबी व ट्रॅक्टर दोन्ही जप्त करून सायंकाळी ७.१५ वाजता मुकुटबन पोलीस स्टेशन ला आणून जमा केले.

सदर ठेकेदारांनी रोडच्या कामावर आठ ते दहा ट्रिप अवैधरित्या उत्खनन करून रेती वाहतूक करून टाकल्याची माहिती आहे. ठेकेदार सातपुते यांच्या जेसीबी वर दीड ते दोन लाख व ट्रॅक्टर वर १ लाख ४ हजार दंड लावणार असल्याची माहिती नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी दिली आहे. आधी सुनावणी घेणार नंतर दंड लागणार असल्याचे सांगितले. तालुक्यात इतरही अनेक ठिकाणी रेती व मुरूम चोरी मोठया प्रमाणात सुरू असून यालाही आळा घालणे गरजेचे झाले आहे.

हे देखील वाचा:

भर रस्त्यात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले

एसीवर 40 टक्यांपर्यंतची सूट, ऑफर केवळ रविवार पर्यंत

Leave A Reply

Your email address will not be published.