उद्या वणीत प्रभू विश्वकर्मा जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

0
28

पुरुषोत्तम नवघरे, वणी: 3 फेब्रुवारी रोजी शुक्रवारला सुतार समाजाचे आराध्य दैवत प्रभू विश्वकर्मा यांची जयंती आहे. त्यानिमित्त सुतार समाज वणीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात रक्तदान शिबिर, रांगोळी स्पर्धा, शोभायात्रा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

शुक्रवारी दिनांक 3 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजता रांगोळी स्पर्धा (शहरातील प्रमुख चौकात) होणार आहे. यात प्रथम, द्वितीय, तृतीय असे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. सकाळी 8:30 वा. ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमन बुरडकर राहणार आहे. सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत प्रभू विश्वकर्मा प्रतिमेची शोभायात्रा व कलश यात्रा निघणार आहे. श्री. महादेव मंदिर सुतार पुरा येथून ही शोभायात्रा निघून शहरातील मुख्य चौकातून मार्गक्रमण केल्यानंतर सुतार पुरा येथे या शोभायात्रेचा समारोप होणार आहे.

सकाळी 11 वाजता प्रभू विश्वकर्मा पूजन होणार आहे. संगीता व कवडुजी बुरडकर दाम्पत्याच्या हस्ते हे पूजन केले जाणार आहे. याचवेळी महिलांकरिता हळदीकुंकूचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 11 ते दुपारी 4 पर्यंत रक्तदान शिबिर चालणार आहे. हे शिबिर लाईफ लाईन रक्तपेढीच्या सहकार्यातून घेतले जात आहे.

दुपारी 12 वा श्री .प्रभू विश्वकर्मा जयंती कार्यक्रम प्रमुख पाहुण्याच्या उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र वनकर माजी अध्यक्ष सुतार समाज महासंघ, उद्घाटक तेजश्रीताई नितीन भांदककर प्रमुख पाहुणे किसनराव दुधलकर, अमन बुरडकर, मंगला झिलपे,रूपक अंड्रस्कर,लता झिलपे, हर्षल घोंगे,यांच्या प्रमुख उपस्थिती होणार आहे.

या कार्यक्रमात सुतार समाजरत्न पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार केला जाणार आहे. दुपारी 3 ते 6 स्नेहभोजन व संध्या 6 ते 9 सुतार समाजातील लहान मुलामुलींन करीता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शहरातील व परिसरातील सुतार समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मयात्मज विश्वकर्मामय झाडे सुतार समाज संस्था, महिला मंच, युवा मंच यांनी केले आहे.

Relief Physiotherapy clinic
Loading...