वणी: श्री गुरुदेव सेनेच्या वतीने अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी घेऊन आलेल्या महिलांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयात कोणीच नसल्याने संतापलेल्या महिलांनी आज ता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचे गेटलाच निवेदन चिपकवून आपला निषेध नोंदविला.
मौजा बोर्डा ता.वणी येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री चालू असल्याने गावातील तरुण व शाळकरी विद्यार्थी नशेच्या आहारी जात आहे. एवढेच नाही तर दिवसभर काम करणारा मजूरदारसुद्दा काम करण्याऐवजी दारू पिऊन घराच्या महिलांना मारहाण करीत असतो यामुळे महिलांवर अन्याय अत्याचार वाढत आहे. यामुळे आज श्री गुरुदेव सेनेच्या असंख्य महिलांनी सेनेचे मुख्य संयोजक दिलीप भोयर व मुख्य संघटक मिलिंद पाटील यांचे नेतृत्वात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय गाठले असता या कार्यालयाला चक्क कुलूप आढळून आले.
संबंधित अधिकाऱ्यांना दुरध्वनीने संपर्क केला असता ते कोणतेही उत्तर देत नसल्याचे पाहून महिला चांगल्याच संतापल्या व त्यांनी चक्क निवेदन कार्यालयाच्या गेटला चिकपवून आपला निषेध नोंदविला. या नंतर सदरच्या मागणीचे निवेदन पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांना दिले असता त्यांनी दोन दिवसात बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी सेनेच्या संघटिका किरण पायघन, मनीषा मंडाले साधना चांदेकर, मंदा मडावी, संगीता सीडाम, निर्मला राऊत, रेखा पडवे, अनुपमा मेश्राम, सुमित राऊत, सुमन राऊत, अंजना गजबे, कालाबाई कोडापे, विजय नगराळे, सागर गोचे, सतीश राजूरकर, सचिन काळे, निलेश झाडे, संतोष बेसरकर विजय आस्वले, प्रणित मडावी, चेतन काकडे आदी उपस्थित होते.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.