खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आंदोलकांचा आरोप
तालुक्यातील बेरोजगार तरुणांचे मुकुटबन ठाणेदारांविरोधात तक्रार
सुशील ओझा, झरी: काही दिवसांआधी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार व प्रकल्पग्रस्त असलेल्या 70 ते 80 युवकांनी परिसरातील कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावा या मागणीसाठी आंदोलन केले होते. दरम्यान मुकुटबनच्या ठाणेदारांनी आंदोलकाचे नातेवाईक असेलेले दीपक उदकवार यांना ठाण्यात बोलावून आंदोलकांवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करून मारहाण केली जाईल अशी धमकी दिली, असा आरोप दीपक उदकवार यांनी तक्रारीतून केला आहे. याबाबत एसपींकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
झरी तालुक्यात कोळसा, चुनखडी व इतर धातूचा साठा भौगोलिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. यासह तालुक्यात 5 मोठ्या खाणी तसेच सिमेंट उद्योग आहे. दरम्यान या उद्योगामध्ये स्थानिकांना रोजगार देण्यात डावलले जात असे असा स्थानिक तरुणांचा आरोप आहे. यासाठी काही दिवसांआधी तालुक्यातील युवकांनी आंदोलन केले होते. चार दिवसांआधी एका कंपनीतील अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मा सोनुने यांनी निवेदनकर्त्याचे नातेवाईक असलेले दीपक उदकवार यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवले व तुझ्या पुतण्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करून मारहाण करणार अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
ठाणेदारांच्या खासगी कंपनीतील अधिका-यांशी असलेल्या मधूर संबंधांमुळे व अधिका-यांच्या सांगण्यावरून धमकी दिली असल्याचा तक्रारकर्त्यांचा आरोप आहे. या प्रकरणा चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जयंत उदकवार, सुनिल जिंनावार, आजाद उदकवार, अनुप धगडी, पंढरीनाथ धांडे, अंकुश ढोके, उमेश पोतराजे, विष्णुकात पेटकर, पंढरीनाथ धांडे, निलेश येडे यांच्यासह आंदोलकांनी केली आहे.
हे देखील वाचा:
स्पेनमधील रांगोळी महोत्सवासाठी वणीच्या अश्विनी वऱ्हाडे हिची निवड
बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतक-याचा सर्पदंशाने मृत्यू