स्वतंत्र ओबीसी जनगणनेबाबत ओबीसींचे वणीत जोरदार निदर्शने
स्वतंत्र जनगणना, आरक्षण इत्यादी मागण्यासाठी ओबीसी आक्रमक
जब्बार चीनी, वणी: स्वतंत्र जनगणना, ओबीसींचे आरक्षण व ओबीसींचे हक्क इत्यादी मागणीसाठी आज गुरुवारी दिनांक 24 जून रोजी वणीत ओबीसी महासंघाद्वारे जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर आंदोलकांनी तहसीलवर धडक देत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यास अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही. याबाबत विविध ओबीसी संघटनेने वेळोवेळी मोर्चा तसेच आंदोलने करण्यात आली. त्यामुळे अखेर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. वणीत देखील हे आंदोलन करण्यात आले. दुपारी 12 वाजताच्या दरम्यान ओबीसी आंदोलक टिळक चौकात गोळा झाले. तिथे करत ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हायलाच पाहिजे याबाबत जोरदार नारेबाजी करत सरकारच्या ओबीसींविषयक धोरणांचा निषेध केला. त्यानंतर तहसीलवर धडक देत आंदोलकांनी विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिले.
वारंवार मोर्चे, आंदोलन, निदर्शने, निवेदन देऊनही केंद्र सरकार ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करीत नाही. याउलट केंद्र सरकारने ओबीसींचे विविध क्षेत्रातील आरक्षण कमी करण्याचा सपाटा लावला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने स्थानिक स्वराज संस्थेतील राजकीय आरक्षण सध्या रद्द झाले आहे. राज्य सरकारने आयोग नेमून इम्पेरीकल डाटा सुप्रीम कोर्टासमोर त्वरीत मांडावे, ज्यामुळे ओबीसींचे आरक्षण पुर्ववत होईल. महाराष्ट्र राज्यातील आठ जिल्ह्यातील कमी केलेले आरक्षण पूर्ववत करावे व ओबीसींच्या इतर केन्द्र व राज्य सरकार कडे प्रलंबीत मागण्या पूर्ण कराव्यात इ. मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजुरकर यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन केले गेले. यावेळी विजय पिदुरकर, सुरेश बरडे, विवेकानंद मांडवकर, टिकाराम कोंगरे, गजानन चंदावार, प्रमोद वासेकर, प्रमोद निकुरे, गोविंदराव थेरे, भास्कर गोरे, दीपक रासेकर, गजेंद्र काकडे, अंजू राजूरकर, नीलकंठ धांडे, चंदू लेडांगे, मंगल बलकी, निरंजन खाडे, नारायण मांडवकर, ऋषी पेचे, भाऊ आसुटकर, प्रदीप बोरकुटे, संदीप गोहोकार, विकास पिदूरकर, सुनील वरारकर, गणेश मत्ते, दिनकर बोबडे, लक्ष्मण इद्दे, अंबादास वागदकर यांचेसह शेकडो ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.
हे देखील वाचा: