प्रतिबंधीत तंबाखूची विक्री व वाहतूक केल्या प्रकरणी दोघांना अटक

माल सप्लाय करणा-या विक्रेत्यालाही कोरपना येथून अटक

1

विवेक तोटेवार, वणी: चंद्रपूर जिल्हातून प्रतिबंधित असलेला मजा तंबाखूची वाहतूक व विक्री करणाऱ्या दोन इसमांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय ज्यांच्याकडून त्यांनी हा प्रतिबंधित तंबाखू विकत घेतला त्यालासुद्धा चंद्रपूर जिल्हातील कोरपना येथून अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई ठाणेदार यांच्या डीबी पथकाने केली.

गोपनीय सूत्रानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारावर वणी डीबी पथकाने जैन ले आऊट येथे एक इसम मुनाल नवनाथ वेलेकर (33) पानठेला चालक जैन ले आऊट याच्याकडून प्रतिबंधित तंबाखू (मजा) चे 35 डब्बे किंमत 25 हजार 960 रुपये जप्त करण्यात आले. याच वेळी खबर मिळाली की, भालर रोडवरून एक इसम ऍक्टिव्ह दुचाकीने तंबाखू विक्रीसाठी घेऊन जात आहे. डीबी पथकाने पाठलाग करून ऍक्टिव्ह (MH 34 BL 0560) अडविली. दरम्यान त्याच्याकडेही प्रतिबंधीत तंबाखू आढळून आला. त्यामुळे गाडी चालक संतोष राजाराम वैद्य (52) रा. भगतसिंग चौक वणी यास अटक केली. त्याच्याकडून 15100 रुपये नगदी, 14 हजार 790 रुपयांचा मजा तंबाखू, व 50 हजारांची दुचाकी असा एकूण 64 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचे शिवाजी आखाडा जवळ किराणा दुकान असल्याची माहिती आहे.

दोघांनाही विचारपूस केली असता त्यांनी चंद्रपूर जिल्हातील कोरपना येथील व्यापारी लक्ष्मण बापूराव ताजने (40) यांच्याकडून सदर माल खरेदी केल्याची माहिती दिली. पोलीसांनी यालाही आरोपी बनवत लक्ष्मण यास अटक केली. यांच्यावर अन्न सुरक्षा मानके कायदा 2006, नियम व नियमाने 2011 चे कलम 26(2) (1), कलम 27 (3) (इ), कलम 23 साहवाचन कलम 30 (2) (ब) कलम 59 सहकलम 188 भादवी नुसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवर, ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुदर्शन वनोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, पंकज उंबरकर, हरींद्र भारती, दीपक वांड्रसवार यांनी केली.

हे देखील वाचा:

वणीतील रविनगर येथील घर (ड्युप्लेक्स) विकणे आहे

सर्वात कमी किमतीत शेतीच्या कुंपणासाठी झटका मशिन उपलब्ध

करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप टू डेट

Leave A Reply

Your email address will not be published.