भांडे घासत असताना झगडा करणे महिलेला भोवले….

कोर्टाने दिली 'ही' शिक्षा.....

0

सुशील ओझा, झरी: मारहाण व शिवीगाळ केल्या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी के. जी. मेंढे यांनी आरोपी ताराबाई मदन अग्रवाल (55) रा. अडेगाव या महिलेला एक वर्षाच्या कालावधीत सदवर्तन ठेवावे व याच कालावधीत शांततामय जीवन व्यतीत करावे अशी शिक्षा सुनावली आहे.

तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत फिर्यादी ही 09 जुलै 2016 ला सकाळी 9 वाजताच्या सुमारास आपले घरासमोर भांडे घासत असताना भांड्याचे शिंतोडे पाणी रोडवर टाकले. त्यावरून आरोपी महिलेने वाद घालत फिर्यादीस शिवीगाळ केली. पाण्यावरून झालेला हा वाद इतका वाढला की आरोपीने फिर्यादीस दगड फेकून मारले, दगड कपाळावर लागल्याने फिर्यादी जखमी झाली तसेच आरोपी जीवाने मारण्याची धमकी दिली.

वरुन फिर्यादीने पोलीस स्टेशन ला रिपोर्ट दिला पोलीसांनी आरोपी विरूद्ध भा.द वि. चे कलम ३२४, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंद केला व सदर गुन्हाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गोपाल नेहारे यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.

प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने फिर्यादी, डाँक्टर व तपास अधिकारी यांचे साक्षदारांचे पुरावे नोंदविण्यात आले. साक्षिदारांचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली यात सरकारी पक्षाचे वतीने सहाय्यक सरकारी वकील पी डी कपूर व कोर्ट पैरवी जमादार रमेश ताजणे व सुरेश राठोड यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.