दीपक चौपाटी येथे राडा: दोन इसम जखमी

गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील दीपक चौपाटी परिसरात मंगळवार 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास दोन इसमांमध्ये भांडण झाले. या भांडणात एक इसमाने दुसऱ्यावर धारदार शास्त्राने वार केला. या हल्ल्यात जखमी झालेला व्यक्ती हा सेवानगर परिसरातील असल्याने सेवानगर परिसरातील काही लोकांनी वार करणाऱ्या त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. पोलिसांनी लवकर घटनास्थळ गाठून दोघांनाही ताब्यात घेतले आहे. यात जखमी झालेल्या दोघांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

मंगळवार 20 ऑक्टोबर रोजी वणीतील दीपक चौपाटी परिसरात दोन व्यक्तींमध्ये राडा झाला. यात राहुल पानघाटे रा. रामपुरा वार्ड याने सेवानगर येथे राहणाऱ्या इसमावर धारदार शास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सदर इसमाला गळ्याच्या बाजूने जखम झाली.

त्यानंतर जखमी व्यक्तीने सेवानगर परिसरातील आपल्या मित्रांना बोलाविले. यावेळी जवळपास 8 ते 10 लोकांनी राहुल याच्यावर करण बारसमोर लाथाबुक्क्यांनी मारहाण केला. यावेळी काही जणांनी लोखंडी बकेटने राहुलवर हल्ला केला. राहुलला जबर मारहाण केली.

एका इसमाने एका मोठ्या दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही लोकांनी मध्यस्ती करीत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केल्याने जीव वाचला. हे घटना होत असतानाच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. लवकर पोलीस घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा या मारहाणीत अप्रिय घटना घडली असती.

पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.