बहुगुणी डेस्क, वणी: आश्वासनाची खैरात करून सर्व उमेदवार मतदारांकडे मतांचा जोगवा मागत आहे. परंतू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर आजवर मनसेने केलेल्या कामांचा पाढा वाचत या निवडणूकीत कामाच्या आधारे आपला आमदार निवडून देण्याचे आवाहन मतदार राजाला करीत आहे. गेल्या १० वर्षात भाजपा सत्ताधारी पक्षाचा आमदार मतदारसंघाला लाभला आहे. परंतू मतदार संघ विकासापासून कोसो दुरच राहिला तर सर्व समस्या जैसे थे च राहिल्या पण सत्ता नसताना सुध्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले, असे मनोगत राजू उंबरकर यांनी पुरड, पूनवट, नायगाव या प्रचार दौऱ्यात व्यक्त केले. या सर्व गावात भेटी देत मतदारांशी संवाद साधला. दरम्यान मनसेमध्ये मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथील तंटामुक्ति अध्यक्षासह, ग्रामपंचायत सदस्यांनी प्रवेश केला.
आजवर उंबरकर यांच्या कडून शेतकरी, शेतमजुर, युवा, विद्यार्थी, महीला, बेरोजगार, व्यापारी यासह सर्व समाज घटकांसाठी कामे केल्याचा इतिहास आहे. याआधारे मनसेने चांगला जनाधार आणि युवकांची फळी जमविली आहे. आता याच सर्व गोष्टींचा फायदा मनसेला होणारं असल्याने या निवडणूकीत मनसेचा ऐतिहासिक विजय होणार असा, विश्वास उमेदवार राजू उंबरकर यांनी व्यक्त केला.
या प्रचार दौऱ्यात मनसेचे फाल्गुन गोहोकार, रामकृष्ण बोबडे पाटील, रत्नाकर मिलमिले, संजय येसेकार, आकाश काकडे, सरपंच शुभम भोयर, उपसरपंच प्रशांत तोरे, गोपाळ कोंगरे, अनिल वासेकर, राम गोहोकार, सोपान भगत, अंकुश बोढे, हिरा गोहोकार, डॉ.विलास बोबडे, अनिल वैरागडे, गजानन मोहितकार, विजय पिदुरकार, अमोल पचारे, वैभव पिदुरकार, विठ्ठल कोंगरे यांच्या सह सर्व गावकरी उपस्थित होते.
नरसाळा येथील तंटामुक्ती अध्यक्षांचा मनसेत प्रवेश
आज नरसाळा येथील तंटामुक्ती अध्यक्ष रवी बाभडे, ग्रामपंचायत सदस्य धनंजय तोडासे, महेंद्र तिखट, प्रदीप आत्राम, प्रशांत कडुकर, आदिवासी समाज संघटनेचे अमोल उईके, सोपान बोढे, रामदास डाहुले, विशाल गोहरकार, सुरज रायपुरे, ज्ञानेश्वर मोहूर्ले, गजानन नेहारे, ऋषिकेश उईके यांच्यासह अन्य सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षांमध्ये प्रवेश केला. सर्वांचे राजू उंबरकर यांनी स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, महिला तालुकाध्यक्ष उज्वला चंदनखेडे, नागेश रायपुरे, विशाल रोगे, शुभम भोयर, प्रशांत तोरे, सुरज नागोसे यांच्यासह मारेगाव तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed.