सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: राजस्थानातील जयपूर येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे 16 वे राष्ट्रीय अधिवेशन झाले. हे अधिवेशन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सोमजीभाई डामोर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या अधिवेशनात वणी येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या महाराष्ट्र राज्य महिला शाखा अध्यक्ष पुष्पाताई आत्राम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना सन्मानाने राजस्थानी पेहराव देण्यात आला. यावेळी विचारमंचावर राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी अरविंद नैताम, राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकरलाल बोडात, राष्ट्रीय महिला शाखा अध्यक्ष उर्मिला मार्को, प्रभू नारायण मीना, दीपिका मीना आणि राज्यातील विविध पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच या अधिवेशनात वणी येथील विदर्भ संघटक पी. डी. आत्राम, यवतमाळ जिल्हा सचिव नंदकुमार बोधकर, वणी तालुका सचिव शंकरराव किनाके, सहसचिव शरद बेसकर यांचीही उपस्थिती होती.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post
Comments are closed.