मुकुटबन येथील रामदासजी भोयर यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोयर यांना पीतृशोक

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन येथील रहिवाशी असलेले रामदासजी भोयर यांचे आज सकाळी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष दिलीप भोयर यांचे ते वडील होते. आज सकाळी रामदासजी भोयर यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली. रामदासजी यांच्यावर आज दुपारी 12 वाजता मुकुटबन येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रामदासजी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले सुना व नातवंड असा आप्त परिवार आहे.

Comments are closed.