झरी तालुक्यात येणाऱ्या शिक्षकांना कॉरेन्टाईन करा

भाजपचे शिक्षण विभाग व तहसीलदार यांना निवेदन

0 1,845

सुशील ओझा, झरी: शाळा सुरू होणार असल्याने तालुक्यात जिल्हा परिषद, खासगी इंग्लिश मिडीयम व आश्रम शाळेतील अनेक शिक्षक वणी, मारेगाव, पांढरकवडा, यवतमाळ व इतर ठिकानाहून तालुक्यात हजर झाले आहेत. अशा शिक्षकांनी स्वत:च खबरदारी म्हणून 14 दिवस कॉरेन्टाईन राहावे असे निवेदन देण्यात आले आहे. यवतमाळ दारव्हा नेर नंतर आता वणीलाही कोरोनाचा रुग्ण मिळाल्याने झरी तालुका दहशतीत आला आहे.

तालुक्यातील बहुतांश शिक्षक तालुका व जिल्हा बाहेरील असल्यामुळे ते आपापल्या गावी निघून गेले होते. परंतु शासन  शिक्षण विभाग व ग्रामशिक्षण समिती यांच्या बैठकीनंतर शाळा सुरू करण्याचे निर्णय घेण्यात आला. शाळा सुरू होणार हे निश्चित झाल्याने बाहेर गावावरून सर्वच शिक्षकांची गर्दी तालुक्यात जमणार असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांच्या मनात वेगळी शंका निर्माण होत आहे.

निवेदन देताना भाजपचे सतीश नाकले

झरी तालुका सध्या तरी कोरोनापासून दूर आहे. मात्र बाहेरून येणा-या शिक्षकांमुळे त्यांचा विद्यार्थ्यांशी संपर्क येण्यापूर्वी शिक्षकांनी खबरदारी घ्यावी. त्यांनी कॉरेन्टाईन झाल्यानंतरच सेवेत रुजू व्हावे व तालुक्याच्या बाहेर जाऊ नये. जोपर्यंत कोरोना महामारी संपूर्ण नष्ट होत नाही तोपर्यत शिक्षकांनी तालुक्याच्या बाहेर जाऊ नये तालुक्यात राहूनच शाळेत ये- जा करावे असे आदेश शिक्षण विभागाने द्यावे. असे निवेदनात म्हटले आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश नाकले यांनी शिक्षण विभाग व तहसीलदार यांना याबाबत निवेदन दिले आहे.

Comments
Loading...