7 वा रुग्ण सापडल्यानंतर 32 व्यक्ती कॉरन्टाईन

आतापर्यंत 35 निगेटिव्हना सुट्टी, 49 भरती

0

जब्बार चीनी, वणी: काल कोरोनाचा 7 वा रुग्ण सापडल्यानंतर एकून 32 हाय रिस्क जणांना कॉरेन्टाईन करण्यात आले. या 32 जणांचेही स्वॅब यवतमाळला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आधी ज्या 68 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते त्यातील 64 व्यक्ती निगेटिव्ह तर 4 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्या आहेत. आतापर्यंत 101 व्यक्तींना कोविड केअर सेन्टरमध्ये भरती करण्यात आले होते. त्यातील 35 निगेटिव्ह व लो रिस्क व्यक्तींना डिस्जार्ज देण्यात आला असून सध्या 49 व्यक्ती परसोडा येथील कोविड केअर सेन्टरमध्ये भरती आहे. तर 12 व्यक्ती वैद्यकीय कारणांमुळे होम कॉरेन्टाईन आहे.

पॉजिटिव्ह महिलेचा शहरात मुक्त संचार?
जो सातवा रुग्ण पॉजिटिव्ह सापडला आहे. ती व्यक्ती तीन चार दिवस गावात मुक्त संचार करत होती. प्रशासनाला याबाबत वारंवार माहिती देऊन ही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असा गंभीर आरोप भाजपचे माजी शहराध्यक्ष रवि बेलूरकर व नगरपालिकेचे उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे यांनी केला आहे.

वणीत कोरोनाचा पहिला रुग्ण दिनांक 20 जून रोजी निष्पन्न झाला. तर शनिवारी पॉजिटिव्ह निघालेली महिला ही मालिशचे काम करते. ती व्यक्ती पॉजिटिव्हच्या संपर्कात होती. त्यामुळे त्या व्यक्तीला कॉरन्टाईन करण्याबाबत प्रशासनाला वेळोवेळी सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी ही महिला तीन ते चार दिवस मुक्त संचार होती. अखेर 23 जून रोजी रात्री 9 वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फोन केल्या नंतर रात्री 1 च्या सुमारास त्या व्यक्तीला कॉरन्टाईन करण्यात आले. अखेर त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. उद्या जर या व्यक्तीमुळे इतरांना संसर्ग झाला तर त्याला प्रशासन नाही तर कोण जबाबदार राहणार असा सवाल रवि बेलूरकर यांनी उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.