पुरड (पुनवट) येथे दोन कुटुंबात राडा, बाप-लेक जखमी

शेजा-यातील वाद, काठीने जबर मारहाण... चौघांवर गुन्हा दाखल

वणी बहुगुणी डेस्क: तालुक्यातील पुरड (पुनवट) येथे गुरुवारी संध्याकाळी दोन कुटुंबांमध्ये चांगलाच राडा झाला. जुन्या भांडणातून एका कुटुंबाने दुस-या कुटुंबावर काठीने हल्ला. यात बापलेक जखमी झाले. या प्रकरणी शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन महिला व दोन पुरुषांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नानाजी आडकू धोटे (60) हे पुरड (पुनवट) य़ेथील रहिवासी असून ते त्यांच्या पत्नी व मुलासह गावातच राहतात. ते शेती करतात. त्यांच्या घराशेजारीच गायकवाड कुटुंब राहते. 6 महिन्याआधी त्यांच्या भांडण झाल्याने त्यांच्यात बोलचाल बंद झाली होती.

गुरुवारी दिनांक 4 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास नानाजी हे त्यांच्या पत्नीसह घरी अंगणात बसून होते. त्याच वेळी तिथे गायकवाड कुटुंबातील दोन महिला व दोन पुरुष आले. त्यांनी तुमचा मुलगा शिविगाळ करतो असे म्हणत नानाजी व त्यांच्या पत्नीला चापटा आणि बुक्क्यांनी मारहाण करण्यात सुरुवात केली. यातील एकाने नानाजी यांना काठीने मारहाण केली. दरम्यान घरी भांडणाची माहिती मिळाल्याने नानाजी यांचा मुलगा दुचाकीने घरी आला.

दरम्यान गायकवाड कुटुंबातील एकाने पत्नीची छेड का काढतो? अशी मितेश्वरला विचारणा करीत त्याला दुचाकीवरून खाली पाडले. त्यानंतर त्याला काठीने मारहाण केली. यात त्याच्या डाव्या अंगठ्यावर जखम झाली. त्यानंतर मितेश्वरला काठीने पायावर व पाठीवर मारहाण करण्यात आली. दरम्यान वाद तीव्र होताना पाहून गावातील काही लोक मध्यस्थीसाठी आले व त्यांनी भांडण सोडवले.

या मारहाणीत नानाजी व त्यांचा मुलगा जखमी झाला. तसेच यात दुचाकीचे नुकसान झाले. मारहाणी नंतर नानाजी यांनी शिरपूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गायकवाड कुटुंबातील चार व्यक्तींवर भांदविच्या कलम 323, 324. 34, 427, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

कबड्डी पाहण्यास गेलेल्या व्यक्तीला सेंट्रींग ठोकण्याच्या हातोडीने मारहाण

नोकरी आणि पैशावर दावा करणा-या तोतया पत्नीवर गुन्हा दाखल

Comments are closed.