विवेक तोटेवार, वणी: 6 ऑक्टोबर मंगळवार सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास वणीतील विठ्ठलवाडी येथे कोंबड्याची झुंज सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत 9 जणांना अटक करण्यात आली. सोबतच 7 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात सापडलेल्या 9 जणांवर कलम 188, 269 भादवी 12 (ब) ( क) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळी पोलिसांना खबरीकडून माहिती मिळाली की, वणीतील विठ्ठलवाडी परिसरातील एका खाली प्लॉटमध्ये काही जण कोंबड बाजार भरवीत आहेत. त्यानुसार डीबी पथकाने मंगळवार 6 ऑक्टोबर सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास विठ्ठलवाडी पारिसरात धाड टाकली. येथे काही जण कोंबढ्यांच्या झुंजीवर जुगार खेळत असल्याचे निरदर्शनात आले.
पोलिसांनी तात्काळ धाड टाकत कारवाई केली. या धाडीत 16 नग झुंजीचे कोंबडे, 5 दुचाकी व एक चारचाकी वाहन (MH40 AR8674) व 22130 रुपये नगदी असा एकूण 7 लाख 37 हजार 30 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अतुल पुरूषोत्तम बोबडे (35) रा. कनकवाडी, खुशाल शरद मोहितकर (33) रा. विठ्ठलवाडी, मंगेश वासुदेव ठेंगणे (33) रा. विठ्ठलवाडी, राहुल रुपेश फुटाणे (30) रा. शेगाव, ता वरोरा., बंडू जयराम ढेंगळे (48) रा. गणेशपूर, रुपेश सुरेश आंबूरकर (30) रा. वरोरा, सुभाष मोहन मोते (29) रा. गणेशपूर, प्रवीण भास्कर पराते (32) रा. बोर्डा, संकेत भास्कर ठाकरे (22) रा. वणी यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर कलम 188, 269 भादवी सहकलम 12 (ब) (क) महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनि गोपाल जाधव, सुदर्शन वनोळे, प्रकाश गोरलेवार, प्रभाकर कांबळे, सुनील कुंटवार डीबी पथकाचे सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दीपक वाड्रसवार, अमित पोयाम व जया रोगे यांनी केली.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)