भालरच्या जंगलात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

वणीतील 5 जणांना अटक, सव्वा 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: भालर परिसरातील जंगलात पोलिसांनी कोंबड बाजारावर धाड टाकली. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत वणीतील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. धाड पडताच काहींनी मोटारसायकल घटनास्थळावर टाकून पळ काढला. या कारवाईत सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Podar School 2025

वणी- भालर मार्गावरील भालरच्या उत्तर दिशेला जंगल परिसरात कोंबड्यांची झुंज लावून सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरु असल्याची गोपनिय माहिती ठाणेदार श्याम सोनटक्के यांना मिळाली होती. त्यावरून डिबी पथक प्रमुख पोउनि/झिमटे व त्यांच्या पथकाने सापळा रचून धाड टाकली असता तिथे कोंबड्यांची झुंज सुरू असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळावरून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले तर काहींनी मोटार सायकल घटनास्थळी टाकून पळ काढला. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या कारवाईत मोहम्मद सलिम मोहम्मद मुस्ताक (32), मारोती संपतराव गुरनुले (45) दोघेही रा. रंगारीपुरा वणी, मनिष गोविंद चवरे (31), ललीत मधु चवरे (28), हरिक्रुष्ण नंदु सप्रे (45) तिन्ही रा. सेवानगर वणी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी 1 झुंजीचा कोंबडा, 2 लोखंडी धारदार काती, 5 मोटार सायकल, 3 नग मोबाईल व रोकड असा एकुण 2 लाख 23 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के यांचे आदेशावरून पोउनि/ आशिष झिमटे डिबी पथकाचे अशोक टेकाळे,संतोष आढाव, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली. पुढील तपास डिबी पथकाचे पोउनि/आशिष झिमटे करित आहे.

हे देखील वाचा:

विठ्ठलदास देवचंदमध्ये दिवाळीच्या सर्वात मोठ्या ऑफरला सुरूवात

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळीच्या खरेदीवर करा महा बचत

Comments are closed.