बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील लाठी व पिंपरी शिवारात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर शिरपूर पोलिसांनी धाड टाकली. रविवारी सकाळी कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 5 जुगा-यांना अटक केली तर काही लोक धाड पडताच फरार झाले. या कारवाईत रोख रक्कम, तसेच मृत कोंबडे जप्त करण्यात आले.
शिरपूर पो.स्टे. हद्दीत येणा-या लाठी तसेच पिंपरी (कायर) शिवारात कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची हारजीतचा खेळ खेळत असल्याची माहिती ठाणेदार संजय राठोड यांना मिळाली. माहितीवरून पोलिसांचे दोन पथक तयार करून घटनास्थळी पाठवले. या ठिकाणी कोंबड बाजार सुरू असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली.
लाठी येथून दीपक तेलंग (25) रा. बेसा, सुरेंद्र पिंपळकर (38) रा. चिखली यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून पोलिसांनी रोख 980 रुपये, काती व 2 मृत कोंबडे जप्त केले. तर पिंपरी (कायर) जंगल शिवारात टाकलेल्या धाडीमध्ये पोलीस पथकाने शालिक तुराणकर (38), जावेद शेख (51) व संतोष टेकाम (35) तिघेही रा. नेरड (पु) यांना अटक केली. त्यांच्या कडून 1 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात एपीआय संजय राठोड, सुनील दुबे, अनिल सुरपाम, सुगत दिवेकर, विनोद मोतेराव, विजय फुल्लके, विनोद काकडे यांनी केली.
हे देखील वाचा:
बाहेरगावच्या पाहुण्याला प्रेमनगरमध्ये चाकूचा धाक दाखवून लुुटले
Comments are closed.