बाहेरगावच्या पाहुण्याला प्रेमनगरमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटले

23 हजारांचा मुद्देमाल लंपास, अवघ्या 3 तासात आरोपींच्या आवळल्या मुसक्या

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील “रेडलाईट एरिया” म्हणून ओळखला जाणा-या प्रेम नगर परिसरात एका बार समोर दोन इसमांना चाकूचा धाक दाखवुन लुटले. चोरट्यांनी रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 23 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. मात्र तक्रार देताच पोलिसांनी अवघ्या 3 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

राकेश मोहनसिंग (50) रा. उमरेड येथील रहिवासी असून ते वेकोलित काम करतात. ते शनिवारी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी आपल्या मित्रा सोबत वणी येथे कामानिमित्त आले होते. प्रेम नगर परीसरातील एका बार समोरुन ते आपल्या दुचाकीने जात होते. दरम्यान या भागात उभ्या असलेल्या चार इसमांनी त्यांच्या दुचाकीसमोर जाऊन त्यांची दुचाकी थांबवत त्यांना खाली पाडले. चोरट्यांनी राकेश यांच्या गळ्याला चाकू लावला. त्यांना धमकावून त्यांचा मोबाईल व दुचाकीची चाबी हिसकावली. तसेच पाकेट मधले तीन हजार रुपये काढून घेतले.

झालेल्या प्रकाराने राकेश घाबरून गेले व त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठुन 23 हजारांचा मुद्देमाल चार इसमांनी लुटल्याची तक्रार दिली. तक्रार मिळताच ठाणेदार अजीत जाधव यांनी तत्काळ डीबी पथकाला घटनास्थळी पाठविले. डीबी पथकाचे विकास धडसे, सागर सिडाम, भानुदास हेपट यांनी दीपक चौपाटी गाठली. त्यांनी खबरीकडून आरोपींची माहिती मिळवली.

मिळालेल्या माहितीवरून प्रेमनगर परिसरातून रात्री 12:35 वाजता आरोपी शेख इरफान शेख सलीम (24), शेख शाहरुख शेख सलीम (23) रा. खरबडा मोहल्ला वणी यांना अटक केली तर विजय भारत गेडाम व ईतर एक रा. खरबडा मोहल्ला वणी हे फरार झाले आहे. सदर चारही आरोपीविरुद्ध कलम 392, 34 भादवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी/ दत्ता पेंडकर करत आहे.

हे देखील वाचा: 

लाठी व कायर शिवारातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

Comments are closed.