सिंधी कॉलनीतील मटका अड्यावर पोलिसांची धाड, दोघांना अटक

ठाणेदारांचा पुढाकार, सहका-यांसह मारला छापा

जितेंद्र कोठारी, वणी: पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एका मटका अड्यावर पोलिसांनी धाड टाकली. विशेष म्हणजे ठाणेदार शाम सोनटक्के यांनी स्वत: पथक सोबत घेऊन मटका पट्टी फाडणा-या दोघांना रंगेहात पकडले आहे. ठाणेदारांनी स्वत: पुढाकार घेऊ धाड टाकल्याने मटका व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

Podar School 2025

वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शाम सोनटक्के यांना खबरीद्वारा शहरातील सिंधी कॉलनी येथे मटका सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून ते दुपारी तीन वाजताच्या सुमारास पोउनि शिवाजी टिपुर्णे, सुदर्शन वानोळे यांच्यासह लपत छपत सिंधी कॉलनीतील एका बारच्या बाजूला असलेल्या गल्लीत पोहोचले, तिथे त्यांना काही लोक वरली मटका लावताना आढळून आले. त्यांनी त्वरित या ठिकाणी छापा टाकला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या छाप्यात दोन इसम हाती लागले. त्यांचे नाव अब्दुल हाफिज उर्फ टापू अब्दुल सत्तार (40) रा. मोमिनपुरा वणी व अब्दुल रज्जाक शेख मुख्तार (35) रा. मुकुटबन तालुका झरी असे आहे. त्यांच्याकडून मटका लावण्याचे साहित्य, दोन मोबाईल व 3260 रुपयांची रोख रक्कम आढळून आली. या कारवाईत एकूण 15,760 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दोन्ही आरोपीविरोधात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार शाम सोनटक्के, डीबी पथकाचे शिवाजी टिपुर्णे, सुदर्शन वानोळे, अशोक टेकाडे, हरिंद्रकुमार भारती, विशाल गेडाम, अमोल नुनेलवार यांनी केला. प्रकरणाचा तपास नापोकॉ. सुदर्शन वानोळे करीत आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.