मटका अड्यावर धाडसत्र, मटकाचालकाचे धाबे दणाणले

0

वणी/ विवेक तोटेवार: मंगळवार पासून वणीतील छुप्या मार्गाने सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी टाच आणली. त्या अनुषंगाने बुधवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान वणीतील ज्या ठिकाणी छुप्या मार्गाने मटका जुगार चालत होता. अशा ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून पाच आरोपींना अटक केली आहे. परंतु या कारवाईत मुख्य आरोपी पोलिसांना गवसले नसल्याचे चित्र आहे.

बुधवारी 4 एप्रिल रोजी वणीतील गंगा बारच्या मागील भागात मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. ज्यामध्ये सैय्यद इरफान सैय्यद ताज (32) राहणार मोमीनपुरा व दादाअली गुलजार अली (57) या दोघांना अटक केली. ते कुणाच्या सांगण्यावरून हा व्यवसाय करतात अशी विचारणा केली असता. त्यांनी सांगितले की, शेख अय्याज झरुद्दीन शेख (42) यांच्या सांगण्यावरून सदर व्यवसाय करतो. या दोघांकडून अनुक्रमे 2220 व 2470 नगदी जप्त करण्यात आले.

यानंतर इंदिरा गांधी चौकात मटका जुगार चालवीत असताना गजानन वामनराव शित्तलवार (46) याला अटक करून त्यांच्याकडून 2020 रुपये जप्त करण्यात आले. सादर आरोपी हा ब्राह्मप्रकाश उर्फ भाया अग्रवाल याच्या सांगण्यावरून सदर व्यवसाय करीत असल्याची ग्वाही दिली.

तर एकता नगर येथील नगर परिषदेच्या गाळयात मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली असता, याठिकाणी धाड थकून मोहम्मद शाहिद शेख इस्माईल (41) याला अटक करून त्याच्याकडून 2450 रुपये जप्त करण्यात आले. याने आपल्या मालकाचे नाव शेख अल्ताफ ताजुद्दीन शेख असल्याचे सांगितले.

दुपारी 2.30 वाजता शाम टाकीज जवळ मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी धाड टाकली असता या ठिकाणाहून माधव हरिश्चंद्र वाढई (30) याला अटक केली गेली. त्याच्याकडून 2280 रुपये जप्त करण्यात आले. याने आपला मालक जमीर खान उर्फ जम्मू मेहबूब खान (33) राहणार मोमीनपुरा असल्याचे सांगितले. सदर पाचही जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा नुसार कलम 12अ व कलम 109 भा द वि नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनात डी बी पथकाचे सुदर्शन वनोळे, सुधीर पांडे, दीपक वंडर्सवर, नितीन सलाम, अमित पोयाम, रत्नपाल मोहाडे यांच्यासोबत पो हे कॉ आनंद अलचेवारयांनी केली. तर यामध्ये फिर्यादी स्वतः ठाणेदार बाळासाहेब खाडे आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.