अन् रेल्वेने बैलाला 50 फूट नेले फरफटत, बैल जागीच ठार

रेल्वेत अडकला बैल... मानकी जवळील घटना...

जितेंद्र कोठारी, वणी: मानकी जवळ रेल्वेने एका बैलाला धडक दिली. यात बैल जागीच ठार झाला. आज दुपारी ही घटना घडली. सविस्तर वृत्त असे की अदिलाबादहून दुपारी 3 वाजताच्या सुमारास वणीच्या दिशेने एक मालवाहक रेल्वे येत होती. दरम्यान मानकी परिसरातील एका शेतक-याचा बैल या रुळावर चरत होता. बैल दिसताच गँगमनने हॉर्न वाजवला मात् बैल रुळाच्या बाजूला न झाल्याने मालगाडीची बैलाला जोरदार धडक बसली. धडकेनंतर बैल रेल्वेच्या समोरील बाजूस अटकला. त्यामुळे बैल सुमारे 50 ते 60 फूट फरफटत गेला. अपघात झाल्याचे लक्षात येताच गँगमनने गाडी थांबवली. तोपर्यंत रेल्वेत फसलेल्या बैलाचा चेंदामेंदा झाला होता. गँगमनने बैलाला ओढून बाहेर काढले व रुळालगत टाकले. दरम्यान अपघात झाल्याने काही काळ रेल्वे थांबली होती. त्यामुळे घटनास्थळी परिसरातील लोकांची गर्दी झाली होती.

Comments are closed.