सुशील ओझा, झरी: तालुक्यात ३० मार्च रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने अचानक हजेरी लावली. त्यात अनेक गावातील शेतकर्यांचे कमी जास्त नुकसान झाले. तर ज्वारी मुंगफल्ली व इतर पिकाचेही नुकसान झाले. खरबडा येथे वीज पडून पाच गाईचे मृत्यू झाला. तर मांडवी गावातील अनेक घरांचे छत उडाले. जनावरांचे गोठे तसेच इतर नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.
नुकसान ग्रस्त घरमालकाच्या घरी सभापती राजेश्वर गोंड्रावार यांच्यासह तलाठी गीते, ग्रामसेवक आर डी पाटील, सरपंच लक्ष्मीबाई धुर्वे व ग्रामपंचायत सदस्य यांनी भेटी देऊन पाहणी केली. पंचनामा तयार करून तहसीलदार यांना दिला. नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावे याकरिता सभापती गोंड्रावार प्रयत्न करीत आहे.