राज जयस्वालची न्यायालयीन कोठडीत रवानगी

वीज अभियंत्यावर हात उगारणे पडले महागात

जितेंद्र कोठारी, वणी: महावितरण अभियंत्यासोबत वाद करुन हात मुरगळल्या प्रकरणी येथील व्यावसायिक राज जयस्वाल यांची आज न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली. वीज अभियंता राजेश जिझिलवार यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल करून राज जैस्वाल यांना अटक केली होती. पोलिसांनी आज जयस्वाल याना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश के.के. चाफले यांनी राज जयस्वाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या आदेशानंतर राज जयस्वाल यांची यवतमाळ मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

राज जयस्वाल यांचे घराचे वीज बिल थकीत असून सहायक अभियंता राजेश जिझीलवार यांनी जैस्वाल यांच्या घराचे वीज कनेक्शन कापले होते. याबाबत जाब विचारायला राज जैस्वाल महावितरण कार्यालयात गेले होते. दरम्यान राज जयस्वाल व सहायक अभियंता राजेश जिझिलवार यांच्या वाद होऊन जयस्वाल यांनी जिझिलवार यांचे हात धरून मुरगळले.

याबाबत सहायक अभियंता राजेश जिझिलवार यांनी रात्री 8 वाजता वणी पोलीस स्टेशनमध्ये राज नंदलाल जैस्वाल विरुद्द तक्रार नोंदविली होती. राज जैस्वाल याना जामीन मिळणेकरीता त्यांचे वकील उद्या पांढरकवडा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा:

वीज अभियंतासोबत हुज्जत, टायर व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

वणीत पहाटेपासून पावसाचा कहर, शहरातील रस्ते पाण्याखाली

खुशखबर… वणीत दोन दिवशीय सिनेमॅटोग्राफी प्रशिक्षण शिबिर

Comments are closed.