राज ठाकरे 23 ऑगस्टला वणीत, साधणार पदाधिका-यांशी संवाद

राज ठाकरे यांच्या दौ-यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, मनसेत गेल्या 3 दिवसात 4 पक्षप्रवेश

बहुगुणी डेस्क, वणी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा पुढील आठवड्यात विदर्भ दौरा आहे. त्यानिमित्ताने राज ठाकरे यांचे गुरुवारी दिनांक 22 ऑगस्ट रोजी रात्री वणीत आगमन होणार आहे.  शुक्रवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. ते वणीतील होटल जन्नत येथे निरीक्षक, पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी बैठक घेणार आहेत. राज ठाकरे यांचा दिनांक 20 ते 26 ऑगस्ट असा विदर्भ दौरा आहे. 

राज ठाकरे यांच्या दौ-यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वणी विधानसभेत राजू उंबरकर यांनी पक्ष संघटन वाढवण्यावर भर दिला आहे. गेल्या तीन दिवसात मनसेत 4 पक्ष प्रवेश झाले आहेत. वणी, मारेगाव शहरासह, ग्रामीण मधील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश घेतला आहे. राज ठाकरे यांच्या दौ-यामुळे महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळेच तरुणांचा मनसेकडे कल वाढला आहे, अशी प्रतिक्रिया राजू उंबरकर यांनी दिली .

दामले फैल येथे महिलांचा मनसेत प्रवेश
मंगळवारी वणी शहरातील दामले फैल येथील महिलांनी मनसे नेते राजू उंबरकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा अर्चना बोदाडकर यांच्या नेतृत्वात मनसेत पक्षप्रवेश केला. त्याआधी शहरात 3 ठिकाणी पक्ष प्रवेश झाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहर अध्यक्ष शिवराज पेचे, शहर उपाध्यक्ष मयूर गेडाम, विलन बोदाडकर यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कायम तत्पर असतात. तळागाळातील जनता, महिला भगिनींच्या आरोग्याचे प्रश्न यासाठी कायमच निस्वार्थ भावनेनं काम करत आलेले आहेत. त्याचबरोबर गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी राजू उंबरकर हे स्वतःला वाहून नेतात, हे वणी विधानसभेतील नागरिकांनी अनेक वेळा अनुभवले आहे. त्याच कामाची प्रचिती म्हणून मनसेकडे नागरिकांचा कौल वाढला आहे. अशी प्रतिक्रिया पक्ष प्रवेशाच्या वेळी कार्यकर्त्यांनी दिली.

Comments are closed.