राज्यात दुष्काळ असताना सत्ताधाऱ्यांना धार्मिक मुद्दे सुचतये: राज ठाकरे

वणीतील सभेत राज ठाकरे कडाडले, सत्ताधाऱ्यावर ओढले आसूड

0

विवेक तोटेवार, वणी: आज महाराष्ट्रात 180 तालुके दुष्काळग्रस्त आहेत परंतु सरकार मात्र राममंदिराचा मुद्दा उचलून धरले. मी 1989 पासून राजकारणात आहे मात्र जनतेचे प्रश्न होते तेच आताही कायम आहे. मग सत्ताधार्यांनी केले तरी काय? असा खोचक प्रश्न राज ठाकरे यांनी वणीत बोलताना उपस्थित केला.  22 ऑक्टोबर सोमवारी वसंत जिनिंग सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी राज ठाकरे बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की हल्लीचे सरकार हे फक्त खोटे बोलणारे आहे. सरकारने 1 लाख 25 हजार विहिरी बांधल्या परंतु त्याची तपासणी कोण करणार? खरंच इतक्या विहिरी बांधल्या काय?  नाही तर ही सरकार फक्त खोटे बोलून जनतेची दिशाभूल करीत आहे. ही सरकार म्हणजे घोटाळ्याची सरकार आहे. असं बोलत त्यांनी जलयुक्त शिवारावर चांगलीच टीका केली.

पुन्हा य़ेणार वणीकरांच्या भेटीला

आता निवडणूक नाहीत तरीही वणीवासीयांचा भेटीसाठी मी आलो आहे. यानंतरही मी वणीलासियांच्या संपर्कात राहणार. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात वणीला पुन्हा येणार व प्रस्थापित सरकारचा पहाडा वाचणार असेही राज ठाकरे म्हणाले.

या कार्यक्रमाचे संचालन प्रा दिलीप अलोने यांनी केले. तर प्रास्ताविक राजू उंबरकर यांनी केले. कार्यक्रमाला वणीकरांनी एकच गर्दी केली होती.

तत्पूर्वी सकाळी राज ठाकरे यांचे टिळक चौकात आगमन झाले. टिळक चौकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. स्वागत झाल्यानंतर राज ठाकरे यांनी इतक्या मोठया संख्येने उपस्थित झाल्याबाबत वणीकरांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.