विद्यालय जपत आहे गेल्या २० वर्षांपासून ही परंपरा
राजीव विद्यालयात होतो दरवर्षी हा 'भावबंध' सोहळा
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील राजीव कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या वीस वर्षांपासून ‘भावबंध’ सोहळा साजरा होतो. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वर्गाससह विद्यालयातील प्रत्येक मुलगा व मुलगी एकाच कुटुंबातील सदस्य मानतात. सर्वच भाऊ-बहीण, शिक्षक वडील तर शिक्षिका ही आईप्रमाणे असते. अशी शिकवण विद्यालयात दिले जाते.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी व विद्यर्थिनी यांनी एकमेकांना ओवाळणी केली. मुलींनी सर्व मुलांना राखी बांधली. विद्यार्थी भावांनीसुद्धा आपल्या बहिणींचे रक्षण करण्याची शपथ घेतली. रक्षाबंधन कार्यक्रमात सामूहिक रक्षाबंधनाचे महत्व प्रा. देविदास गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थाना सांगितले.
विद्यालयात सुसंवाद अंतर्गत संसद वक्तृत्वस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. देविदास गायकवाड होते. प्रमुख पाहुणे विठ्ठल पाईलवार होते. स्पर्धेत प्रथम कु. प्रांजली भुसे, द्वितीय कु.अंकिता ढोके व तृतीय कु.स्वाती माशटवार ही आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, प्रा. अमोल राऊत, प्रा. प्रवीण भोयर, विठ्ठल चुकुलवार आणि राहुल तोटावार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.