कोल्हापूर- सांगलीच्या पूरग्रस्तांना वणीकरांचा मदतीचा हात

विविध सामाजिक संस्थांनी घेतला पुढाकार

0

बहुगुणी डेस्क, वणी: कोल्हापूर- सांगली भागांत निसर्गाचा प्रकोप झाल्यामुळें या परिसरातील अनेक गावांना पुराचा जबरदस्त तडाखा बसला. यातील संकटग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी व व्यापारी असोसिएशन वणी यांनी वणीकरांना साद घातली. वणीकरांनी पाच दिवसात प्रचंड प्रतिसाद दिला.

अनेक जीवनावश्यक वस्तू एका मोठ्या ट्रकमध्ये भरून येथील टिळक चौकातून रवाना करण्यात आले. या प्रसंगी वणीकरांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार श्याम धनमाणे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश खुराणा, रोटरी क्लबचे निकेत गुप्ता, राष्ट्रवादीचे डॉ. महेंद्र लोढा, प्रा. दिलीप मालेकर, सामाजिक कार्यकर्ते संजय देरकर, उपस्थित होते. या अतिथीसोबत माजी नगराध्यक्षा साधना गोहोकार, स्वर्णलीलाचे किशन जैन, गजानन कासावार यांनी वणीकराप्रती कृतज्ञता व्यक्त केली. रोटरी क्लब व व्यापारी असिसिएशनने अशा सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. सदर प्रसंगी रोटरी क्लब चे सर्व सदस्य उपस्थित होते तसेंच बहुसंख्य वनीकर दानदाते व जनता, विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील सामाजिक संस्था, व्यापारी संस्था, शैक्षणिक, सांस्कृतिक, व धार्मिक संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून सढळ हाताने मिळालेल्या मदतीमुळे 13 लाख रुपयांचे साडे सोळा टन साहित्य जमा झाले. यात 30 प्रकारचे जीवनावश्यक वस्तूंची 1 हजार कुटुंबासाठी 1 हजार किट तयार करून पाठविण्यात आले आहे. सदर साहित्य प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पाहोचविण्यासाठी वणी वरून रोटरीचे नीलेश चौधरी, निकेत गुप्ता, सुधीर साळी, विनोद बाजोरिया, किसन जैन, राजेश राठी, निकुंज अटारा, राजू गव्हाणे नियोजित ठिकाणी गेले आहे. या प्रसंगी प्रास्ताविक राजाभाऊ पाथ्रडकर यांना तर आभार प्रदर्शन- सुधीर साळी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.