Lodha Hospital

राजू उंबरकर यांचे आजपासून आमरण उपोषण सुरू

विविध आरोग्यविषयक मागण्यांसाठी तहसिल कार्यालयासमोर उपोषण

0

जब्बार चीनी, वणी: वणीच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करावे व ट्रामा सेंटरनमध्ये जंबो कोविड केअर सेंटर सुरू करावे या मागणीसाठी मनसेने आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालयासमोर आज सोमवार दिनांक 5 ऑक्टोबरपासून मनसैनिकांतर्फे उपोषण सुरू करण्यात आले आहे.

वणी ग्रामीण रुग्णांलयाचे उपजिल्हा रुग्णांलयात श्रेणीवर्धन करावे असा निर्णय 17 जानेवारी 2013 ला निर्गमीत करण्यात आला होता. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. सध्या ग्रामीण रुग्णालयात 30 खाटांचे रुग्णालय आहे. या रुग्णालयाला 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याची मान्यता देण्यात आली आहे. इतर ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यात आले आहे. मात्र वणीत अद्यापही यावर कार्यवाही झालेली नाही असा आरोप मनसेतर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करावे. अशी मागणी करण्यात आली आहे.

Sagar Katpis

वणीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये योग्य त्या सोयी सुविधा नसल्याने गंभीर रुग्णांना यवतमाळ येथे उपचारासाठी हलवण्यात येते. वणी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या ट्रामा सेंटरच्या जागेत सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेले कोविड केअर सेंटर सुरु करावे अशीही मागणी मनसे तर्फे करण्यात आली आहे.

आज राजू उंबरकर यांचेसह मनसेचे संतोष रोगे, फाल्गून गोहोकार, रंजित बोंडे, अनंता जुमळे, अरविंद राजुरकर, उदय खिरटकार, प्रविण नान्हे, सुरेश काळे, चंद्रकांत धोबे, मारोती डूकरे, बंडू येसेकार, शंकर पिंपळकर हे मनसैनिक उपोषणाला बसले आहे. या उपोषणाला प्रेस वेलफेअर असोशिएशन, जागृत पत्रकार संघ, वणी व्यापारी असोशिएशन, न्यूज मीडिया पत्रकार असोसिएशन, बार असोसिएशन मारेगाव, बार असोसिएशन वणी, संभाजी ब्रिगेड यवतमाळ जिल्हा यांनी पाठिंबा दिला आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!