बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याने शेती खरडली, शेतक-यांचे नुकसान

राजू उंबरकर यांनी घेतली नुकसानग्रस्त शेतक-यांची भेट

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या आठवड्यापासून वणी उप विभागात मुसळधार पाऊस झाला. संततधार पाऊस आणि सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती आणि बेंबळा प्रकल्पाच्या कालव्यातून पाण्याचा होणारा निचरा यामुळे मारेगाव तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमीन चक्क खरडून गेली. मारेगाव तालुक्यातील हिवरा मजरा, चोपन, मार्डी, बामर्डा, गोरज येथील नुकसानग्रस्त शेतक-यांची राजू उंबरकर यांनी भेट घेतली.

मारेगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याचे काम सुरू आहे. कालव्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने चॅनल गेट बंद ठेवले होते. पावसाचा संततधार भडिमार सुरू असल्याने लगतचा बांध फुटला आणि शेकडो हेक्टर शेती खरडून निघाली. पिके पुर्णतः नष्ट झाली, शेतकरी दुबार पेरणीच्या उंबरठ्यावर आला. प्रशासनाच्या चुकीचा फटका शेतकऱ्यांना बसला.

मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर उंबरकरांनी बेंबळा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत पंचनामा नंतर पाहिले मदत अशी मागणी केली. बेंबळा प्रकल्पाच्या वतीने पीडित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येणार असल्याचे आश्वासन घेतले व शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी मनसे प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

याप्रसंगी मारेगाव तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, तालुका उपाध्यक्ष वामन चटकी, वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहकार व वणी शहर अध्यक्ष शिवराज पेजे, अजित शेख, विलन बोदाडकर, सरपंच शुभम भोयर, रोशन शिंदे, संकेत पारखी, लोकेश लडके, रुचीर वैद्य यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

त्या शेतकऱ्याला घेतले दत्तक
बेंबळा प्रकल्पाच्या अनागोंदी कारभारामुळे मारेगाव तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती बाधित झाली. हिवरा मजरा येथील राकेश नामदेव धानोरकर या शेतकऱ्याची दोन एकर शेती पूर्णतः खरडून गेली. त्या गरीब शेतकऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला असताना उंबरकर यांनी शेतीची व उपजीविकेची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच देविदास बुटे, पांडुरंग धानोरकर, प्रशांत बुटे, गजानन पिंपळशेंडे, बालाजी देवतळे , चंपट डोंगे, गजानन काळे, आनंदराव सोयाम, विद्या बोधाने, रामाजी मालेकर यांना सुध्दा तातडीने मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

हे देखील वाचा: 

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक, दुचाकीस्वार जागीचठार

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

 

Comments are closed.