तरुणांचा मनसे प्रवेश, उंबरकर यांना मिळाली तरुणाईची ताकद
तरुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करणार - राजू उंबरकर
विवेक तोटेवार, वणी: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या संख्येने तरुणांनी मनसेमध्ये प्रवेश घेतला. रविवारी दुपारी 2 वाजता राजू उंबरकर यांच्या शिवमुद्रा या जनसंपर्क कार्यालयात उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. युवकांना मनसेच्या विचारधारेची आकर्षण वाटू लागल्यामुळे ते पक्षात सामील होत याहे, अशी प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी दिली.
विविध क्षेत्रांतील युवकांनी मनसेत आपली निष्ठा दाखवली. उंबरकर यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून पक्षाच्या ध्येयधोरणांना समर्पित राहण्याचे आवाहन केले. हजारोंच्या संख्येने युवकांनी मनसेच्या झेंड्याखाली सामील होऊन आपल्या निष्ठेचा संदेश दिला. या युवकांच्या सहभागामुळे आगामी निवडणुकीत मनसेची ताकद अधिक वाढणार असल्याचे मत पक्षनेते राजू उंबरकर यांनी व्यक्त केले.
तरुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करणार – राजू उंबरकर
महाराष्ट्रातील युवकांमध्ये प्रचंड ताकद आहे, आणि ही ताकदच राज्याच्या विकासासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मनसे युवकांना संधी देऊन त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे, परिणामी ते राज्याच्या विकासात सक्रिय भूमिका निभावू शकतील. – राजू उंबरकर, नेता मनसे
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहर उपाध्यक्ष मयूर गेडाम, विलन बोदाडकर विठ्ठल हेपट आकाश काकडे सचिन बोढे हिरा गोहोकार विजय चोखारे नरेश शेंडे मयूर पिदूरकर बादल धांडे आशिष बोबडे मनोज बघवा प्रतीक गौरकार अनिकेत चिकटे गणेश गोहोकार नीरज बोरकुटे राजू चौधरी राजू विचू निखिल खाडे मंगेश ढेंगळे हिमांशू बोहरा सुरज काकडे धीरज बघवा इत्यादी पदाधिकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments are closed.