मारहाण प्रकरणी राजू उंबरकर यांना जामीन

शुक्रवारी सकाळी झाली होती अटक

0

विवेक तोटेवार, वणी: पैसे बुडवल्याच्या आरोपावरून मंगळवारी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी सहारा इंडियाच्या कर्मचा-याला कार्यालयात जाऊऩ मारहाण केली होती. या प्रकरणी त्यांना व त्यांच्या सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना जामीन मिळाला आहे.

मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सहारा इंडियाच्या कार्यालयात गेले होते. तिथे अनेक जमाकर्त्यांचे पैसे अडकून आहेत. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी तिथल्या कर्मचा-याला मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओही मनसेच्या कार्यकर्त्यांतर्फे व्हायरल करण्यात आला होता.

सदर कर्मचाऱ्याने वणी पोलिसात राजू उंबरकर व त्यांच्या सात कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून राजू उंबरकर व त्याच्या सहकाऱ्यांवर विविध कलमान्वये वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सहारा इंडिया या कंपनीमध्ये परिसरातील अनेक गोरगरीब जनतेने पैसे फिक्स डिपॉजिटमध्ये जमा केले आहे. या फिक्स डिपॉझिटचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही पैसे मिळत नसल्याने काही लोकांनी याबाबतची तक्रार मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्याकडे केली. राजू उंबरकर यांनी मंगळवारी दुपारी दोन वाजता सहारा इंडिया यांचे वरोरा रोड येथील ऑफिस मध्ये जाऊन याबाबत विचारणा केली.

कर्मचारी अनुराग दिगंबर शुक्ला यांनी याबाबत कोर्टात केस सुरू असल्याचे राजू उंबरकर यांना सांगितले. परंतु राजू उंबरकर यांनी गरिबांचे पैसे का खाल्ले? अशी विचारणा करत अनुराग व त्यांच्या सहकारी यांच्यावर हल्ला केला. घाबरलेल्या अवस्थेत अनुराग व त्यांचा सहकारी वणी पोलिसात तक्रार दिली.

अखेर बुधवारी तीन तारखेला उशीरा रात्री राजू उंबरकर, धनंजय त्रंबके, अजिज शेख, इरफान सिद्दिकी, प्रदीप बांदोडकर, अनिल ढगे यांच्यावर कलम 143, 147, 452, 294, 323, 504, 506 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.