शेतक-यांच्या कामात वीज वितरणचा खोडा

वीज सारखी गुल झाल्याने बँकेच्या व्यवहारावर परिणाम

0

पंकज डुकरे, कुंभा: ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना यंदा चांगलाच फटका बसत आहे. दुबार पेरणी करीता शेतकरी धडपडत असताना वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे बँकेचे कामकाज ठप्प पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आल्या पावली हताश होऊन परतावे लागत आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

कुंभा परिसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वारंवार विज गुल होत असल्यामुळे कुंभा येथील एकमेव जिल्हा मध्यवर्ती बँकेतील इन्व्हर्टर चार्जिंग होत नसल्यामुळे मोठी धांदल उडते. शेतकऱ्यांची बँक अशी ओळख असलेल्या बँकेमध्ये हजारो शेतकरी ग्राहक आहे. सध्या पीक कर्जासह दुष्काळी मदतीचे वाटप सुरू आहे. त्यामुळे बँकेमध्ये तोंबा गर्दी असते.

मात्र विज वितरणाच्या भोंगळ कारभाराने विज क्षणभर टिकते. त्यामुळे इन्व्हर्टर चार्जिंग होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कर्मच्याऱ्याची वाद झाल्याच्या घटना घडत आहे. शेवटी नटकीच्या लग्नाला बारा विघ्न म्हणत शेतकरी हताश होऊन परतत आहे. त्यामुळे विजवीतरण कंपनीविरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.