राजुर कॉलरीतील दीक्षाभूमीत धम्मपरिषद

डॉ. महेंद्र लोढा स्वागताध्यक्ष तर आनंद महाथेरो उद्धाटक

0

महेश लिपटे(राजूर कॉ): तालुक्यातील राजूर येथे तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून वैचारिक पर्वणी,पुरोगामी विचार व बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार व्हावा, या दृष्टिकोनातून धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी विविध कार्यक्रमांची मेजवानी बौद्ध अनुयायांना मिळणार असून परिषदेचे स्वागताध्यक्ष डॉ महेंद्र लोढा तर अध्यक्षस्थानी राजरत्न आंबेडकर राहणार आहेत.
राजुर कॉलरीमधील दीक्षाभूमी परिसरात 28 ते 30 एप्रिल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा हे असतील तर कार्यक्रमाचे उद्घाटक भदन्त आनंद महाथेरो,आग्रा हे करणार आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू तथा साहित्यिक राजरत्न आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहणार आहे. जे.एन.यू च्या डॉ.मुन्नी भारती,दिल्ली या राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून अशोक वानखडे,दिपक नगराळे, प्रा. डॉ.अविनाश घरडे, ठाणेदार बाळासाहेब खाडे, युवराज जंगले,अशोक वानखडे,वसुंधरा गजभिये आदी उपस्थित राहणार आहे.आयोजित कार्यक्रमात वसंत गेडाम, उज्वल गजभार व अनुष्का पाझारे यांचा सत्कार होणार असून सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दुसऱ्या दिवशी ‘सांस्कृतिक दहशतवादाच्या आणि धार्मिक मूलतत्वाच्या मूलतत्त्ववादाच्या वादात काळात बुद्ध,आंबेडकर विचारांनी परिपक्व समाज घडू शकतो’ या विषयावर मंथन होणार असून,आनंद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली भै़या खैरकार, पुष्पाताई बौद्ध, डॉ.परमानंद, भूपेंद्र रायपुरे हे विचार मांडणारआहेत हे विचार मांडणार आहेत. दुसऱ्या सत्रात ‘संविधान साक्षरता म्हणजे माणसाच्या नव्या जाणिवेची पहाट’ या विषयावर धर्मराज निमसरकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.नीलिमा चव्हाण, प्रा.जावेद पाशा व दिलीप चौधरी हे विचार व्यक्त करणार आहेत. तिसऱ्या दिवशी ‘समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ.आंबेडकरांचे संविधानिक विचार दिशादर्शक आहेत.’ या विषयावर भदन्त ज्ञानज्योती संघारामगिरी यांच्या अध्यक्षतेखाली अंकूश वाकडे, प्रवीण देशमुख,प्रा. सुभाष गवळी, तेजस गुडदे व विशाल बोरकर हे मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी प्रकाशकुमार व संच द्वारा निर्मित महानाट्य ‘भिमा तुझ्या जन्मामुळे’ सादर करण्यात येणार आहे.

विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर प्रथम दीक्षा समारंभ 14 ऑक्टोबर 1956 ला पार पडला. संपूर्ण देशातील प्रमुख ठिकाणी समारंभ व्हावा ही त्यांची इच्छा होती या त्यान्वये लगेचच 16 ऑक्टोबर 1956 ला चंद्रपूर येथे दीक्षा समारंभ झाला तर तिसरा दीक्षा समारंभ वणी तालुक्यातील राजुर कॉलरी येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र बाबासाहेबांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे तो कार्यक्रम तात्पुरता स्थगित करून सहा महिन्यानंतर बँ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.भदन्त आनंद कौशल्यायन यांच्या हस्ते घेण्यात आला होता. त्यामुळेच दीक्षाभूमी संस्थेच्या वतीने दरवर्षी धम्मक्रांतीचा वारसा जपला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.