राजूर (गोटा) ग्रामपंचायतवर प्रशासकाची नियुक्ती

अखेर नऊ महिन्यांनंतर प्रतीक्षा संपली...

0

सुशील ओझा, झरी: गेल्या ९ महिन्यांपासून राजूर ग्रामपंचायवर प्रशासक नेमण्यासंदर्भात चाललेली चालढकल मोहन भगत यांच्या पाठपुराव्यामुळे निकाली निघाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे..

तालुक्यातील राजूर (गोटा) ग्रामपंचायतमधील सरपंच, उपसरपंच व दोन सदस्यांनी पदाचा गैरवापर करून शासकीय जमिनीवर अवैधरीत्या अतिक्रमण करून ताब्यात घेतली. त्यामुळे चारही पद जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(ज-३) नुसार ८ मार्च २०१८ रोजी अपात्र केले. बाबाराव पिसाराम खडसे, प्रेमिला बाबाराव खडसे, सुंदर बाबाराव खडसे व सपना संजय खडसे हे चारही एकाच कुटुंबातील आई, वडील, मुलगा व सून अपात्र सदस्य आहे, हे विशेष.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध राजूर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व दोन सदस्य अपात्र झाले व सदर आदेशाविरोधात अपात्र सदस्य यांनी अमरावती आयुक्तांकडे अपील दाखल केली. या प्रकरणात आयुक्तांनी १० मार्च २०१८ ला अंतरिम आदेश देत यापूर्वी जिल्हाधिकारी यांनीच दिलेला आदेश कायम ठेवला. जिल्हाधिकारी यांनी आयुक्तांच्या आदेशावरून गटविकास अधिकारी झरी यांना १६ नोव्हेंबर २०१८ रोज ग्रामपंचायतवर प्रशासकीय अधिकारी नेमण्याचे आदेश दिले.

वरील विषयानुसार १० नोव्हेंबरच्या आयुक्तांच्या आदेशात असे कोणतेही आदेश नमूद नव्हते की ज्यामुळे गटविकास अधिकारी यांना प्रशासकीय अधिकारी नेमणूक करण्यात कोणतीही अडचण होणार आहे. परंतु इंग्लिशमध्ये लिहून असलेले आदेश वाचण्यास गटविकास अधिकारी यांना अडचण येत असल्याचे तसेच राजकीय दबावामुळे प्रशासकीय अधिकारी नेमणूक करण्यात दिरंगाई करत असल्याची तक्रार मोहन भगत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली.

अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत १ जानेवारी रोजी प्रशासकीय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी एस. एन. जाधव यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून राजूर ग्रामपंचायतवर नेमणूक केली आहे. ग्रामवासीयांची ग्रामपंचायत पातळीवरील कामे रेंगाळली होती. परंतु मोहन भगत यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक झाल्याने विकासकामे व ग्रामवासीयांचे कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.