यंदा जल्लोषात साजरा होणार श्रीराम जन्मोत्सव
भव्य शोभायात्रेचे आयोजन, घरावर भगवा ध्वज लावण्याचे आवाहन
पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे शहरात होणार रामजन्मोत्सव उत्सव हा साधेपणाने साजरा केला गेला. मात्र कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याने यावर्षी जल्लोषात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्याचा निर्णय़ श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मंगळवारी दिनांक 29 मार्च रोजी यासंबंधी जुने श्रीराम मंदिर येथे बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान डीजे सारखे वाद्य टाळून व घरावर भगवा ध्वज लावून उत्सव साजरा करा, असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी केले आहे.
दीपक नवले यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत प्रशांत भालेराव, राजाभाऊ पाथ्रडकर, रवी बेलूरकर, नितीन शिरभाते, राकेश खुराणा, अनिल आक्केवार, अरुण कावटकर, कुंतलेश्वर तुरविले, श्रीकांत पोटदुखे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शोभायात्रा काढण्यासंबंधी सखोल चर्चा करण्याती आली. शोभायात्रेत डीजे व मोठे वाद्य न लावता भजन, कीर्तनाच्या गजरात पालखी काढणे, शहरात भगवी पताका व घरी भगवा ध्वज लावणे, चौकाचौकात रांगोळी काढणे इत्यादी निर्णय घेण्यात आला.
बैठकीला संतोष डंभारे, मनोज सरमोकदम, राजू जैस्वाल, राजू गव्हाणे, अमित उपाध्ये, अनिल महापुरे, हिरामण संदलवार, शंकर घुंगरे, दीपक मोरे, विशाल दुधबळे, विजू मेश्राम, नंदू नागदेव, अवि आवारी, आशिष डंभारे, पंकज कासावार, प्रणव पिंपळे, निलेश डवरे, कौशिक खेरा, आकाश बुद्धेवार, अमर चौधरी, नितीन बिहारी, अँड प्रवीण पाठक, मयूर मेहता, स्वप्नील बोंडे, कार्तिक पटेल, पावन खंडाळकर, वैभव मांडवकर, कमलेश त्रिवेदी यांच्यासह उत्सव समितीचे सदस्य व श्रीराम भक्त उपस्थित होते.
हे देखील वाचा:
Comments are closed.