वणीत रामनवमी उत्सवाची जय्यत तयारी
वणी/विवेक तोटेवार: शहरात रामनवमी उत्सव समितीद्वारे 25 मार्च रविवार रोजी रामनवमी उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्त वणीचे संपूर्ण रस्ते सजविण्यात आले आहे. वणीतील मुख्य चौक हा पूर्णपणे भगव्या पताकांनी सजविण्यात आला आहे. शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे या शोभायात्रेत वर्धा, शेगांव, यवतमाळ, वरोरा, मांढळी या ठिकाणाहून भजन मंडळे भाग घेणार आहेत.
शोभायात्रेची सुरवात वणीतील जुन्या स्टेट बँकेजवळील राम मंदिरापासून होणार आहे. त्या ठिकाणाहून शोभायात्रा शाम टॉकीज, भारत माता चौक, दीपक चौपाटी, भगतसिंग चौक, गाडगे बाबा चौक, सर्वोदय चौक,आंबेडकर चौक, गांधी चौक, टिळक चौक,खाती चौकात येऊन राम मंदिरापर्यंत येणार आहे. शोभायात्रेत वणीतील सर्व राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये गणपती मंडळ, दुर्गा मंडळ, बजरंग दल यांचाही सहभाग राहणार आहे.
शोभायात्रेच्या स्वागतासाठी एकूण 9 स्वागतद्वार प्रत्येक चौकात उभारण्यात आले आहेत. प्रत्येक चौकात शोभायात्रेत शामिल होणाऱ्या राम भक्तांसाठी अल्पोहाराची व पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शोभायात्रेत अश्वमेध, राम लक्ष्मण सीता,परशुराम यांचे जिवंत देखावे पहावयास मिळणार आहे. वणीतील टिळक चौकात मुस्लिम संघटनेद्वारा शोभायात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे.
या शोभायात्रेत वणीकर जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी केले आहे. मागील वर्षीपेश या वर्षी जनतेचा अधिक सहभाग राहणार आहे .तसेच ग्रामीण भागातील हंताही या शोभायात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती रवी बेलूरकर यांनी वणी बहुगुणीशी बोलतांना दिली. त्यांना या कार्यात राम उत्सव समितीचे कुंतुलेश्वर तुरविले, कौशिक खेरा, आशिष डंभारे, निलेश डवले, अवि आवारी, मयूर मेहता, कुणाल मुत्यलवार, प्रवीण पाठक, पंकज कासावार, अक्षय देठे, ईश्वर घटोळे, रोहन शिरभाते, कुशल मेहता, निलेश मादीकुंटावार या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभणार आहे.