एनबीएसए महाविद्यालयात ‘बिजिनेस इंग्लिश कम्युनिकेशन’ कोर्स सुरू

0

गिरीष कुबडे, वणी: नूरजहाँ बेगम सलाम अहमद कला व वाणिज्य महाविद्यालय वणी येथे हेड-हेल्ड-हाई फाऊंडेशन नागपूरच्या वतीने ‘बिजिनेस इंग्लिश कम्युनिकेशन’ हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. हा अभ्यासक्रम ६ महिने कालावधीचा असून यामध्ये रोज ५ ते ६ तासांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हा कोर्स पूर्ण केल्या नंतर रोजगार प्राप्त करण्याकरिता महाविद्यालय व हेड-हेल्ड- हाई फाऊंडेशन नागपूर द्वारे सहकार्य केले जाणार आहे. हे प्रशिक्षण संपूर्णत: मोफत दिले जाणार आहे. तरी सर्वांनी नुरजहां बेगम महाविद्यालयात संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य वनकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- 7239228386, 9762161590

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…

Leave A Reply

Your email address will not be published.