निधन वार्ता : रमाताई बाजन्लावार यांचे अल्पशा आजाराने निधन

सायंकाळी 4 वाजता मुकुटबन येथील मोक्षधाम मध्ये होणार अंत्यसंस्कार

वणी बहुगुणी : काँग्रेस नेते आणि झरी जामणी पंचायत समितीचे माजी सभापती मुकुटबन येथील भुमारेड्डी बाजन्लावार यांची पत्नी रमाताई बाजन्लावार (53) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. हैद्राबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवार 12 ऑक्टो. रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर हैद्राबाद येथे एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. रमा यांचे पार्थिव हैद्राबाद येथून मुकुटबन येथे आणल्यानंतर सायंकाळी 4 वाजता मुकुटबन येथील मोक्षधाम मध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या मागे पति भुमारेड्डी बाजन्लावार, मुलगा अजय, आकाश, दोन सून, नातू आणि बराच मोठा आप्त कुटुंब आहे. 
Podar School 2025

Comments are closed.