मारेगावात शनिवारी युवक, युवतींसाठी वक्तृत्व स्पर्धा

आजची राजकीय परिस्थिती या विषयावर व्याख्यान

भास्कर राऊत, मारेगाव: येत्या शनिवारी 14ऑक्टोबरला शहरात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलं आहे. स्पर्धेचा विषय ‘आजची राजकीय परिस्थिती’ आहे. लढा संघटनेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 18 ते 35 या वयोगटात होणार आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसं दिली जाणार आहे. 

 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ही राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे. स्पर्धेमध्ये १८ ते ३५ वयोगटातील युवक सहभागी होऊ शकतात. स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार रूपये, दोन हजार  पाचशे रूपये,  दोन हजार, एक हजार पाचशे आणि एक हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. 

मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार  जनार्दन खंडेराव हे स्पर्धेचं उद्घाटन करतील. प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र धानोरकर, प्रा. बाळकृष्ण राजूरकर, भास्कर धानफुले, प्रा. सतीश पांडे, हेमराज कळंबे, बाबाराव ढवस, राजूभाऊ दारुंडे, ज्योतिबा पोटे, आकाश बदकी, विनोद आदे , रवी पोटे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लढा संघटनेचे आनंद नक्षणे, नीलेश बेंडे, रवी घुमे, अविनाश चिंचोलकर यांनी केले आहे. लढा संघटना युवकांचे विचारमंथन व्हावे, युवकांमधील ऊर्जावान व सक्षम वक्ता पुढे यावा आणि त्यांना सामाजिक विचारधारेमध्ये काम करण्याची संधी मिळावी. यासाठी विविध विषयांवर स्पर्धांचे आयोजन करते. 

Comments are closed.