सत्यम हॉटेलचे संचालक रामकृष्ण त्रिवेदी यांचे निधन
आज अंत्यसंस्कार, दु. 2 वा. राहत्या घरून अंत्ययात्रा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: टिळक चौकातील गेल्या 35 वर्षांपासून प्रसिद्ध असलेले सत्यम हॉटेलचे संचालक रामकृष्ण त्रिवेदी यांचे शुक्रवारी रात्री 11.30 वाजाताच्या सुमारास निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होती. सध्या त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होता. रात्री रुग्णालयातून वणीला परत येत असताना वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज शनिवारी दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दु. 2 वाजता त्यांचे निवास स्थान जिल्हा परिषद कॉलनी येथून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुन, नातवंड मोठा आप्तपरिवार आहे.
Comments are closed.