पुरात वाहून जाणा-या तरुणाला लोकांनी वाचवले
रांगणा येथील घटना... वाचवतानाचा थरारक विडीओ व्हायरल...
बहुगुणी डेस्क: गेल्या चार दिवसांआधी पेटूर येथील पुलावरून एक तरुण वाहून गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला चार दिवसही लोटत नाही तर पु्न्हा अशीच एक घटना समोर आली. मात्र यात लोकांच्या सतर्कतेमुळे या तरुणाचा जीव वाचला.
ही घटना आहे वणी तालुक्यातील रांगणा येथील. रांगणा येथील राजू पंढरी निभुदे वय 36 हा तरुण राहतो. तो इलेक्ट्रिशियन तसेच शेतकरी आहे. दुपारी चार चाडेचारच्या दरम्यान तो वणीवरून रांगण्याला येत होता. रांगणा जवळ जायकवाडी हा नाला आहे. हा नाला पार करून रांगण्याला यावं लागते. पुरामुळे सध्या हा नाला दुथडी भरून वाहत आहे. हा नाला लोक एकमेकांची मदत घेऊन पार करत होते. मात्र राजू एकटाच हा पूर पार करत होता.
दरम्यान त्याचा तोल गेला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहू लागला. तिथं असणा-या काही लोकांच्या लगेच लक्षात येता ते त्याला पकडण्यासाठी धाव घेतली आणि त्याला ओढून बाहेर काढले. लोकांच्या सतर्कतेमुळे या तरुणाचा जीव वाचला.
जायकवाडी नाल्यावरच्या पुलाचे ढोले बुजलेले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. गाळ आणि कच-यामुळे पाण्याचा प्रवाह पुलाच्या वरून होतो. तसेच पुलावर खड्डे देखील आहे. जिल्हापरिषद बांधकाम विभागाने पुलाची दुरुस्ती करावी अशी गावक-यांनी वेळोवेळी मागणी केली.
गावक-यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आता बांधकाम विभाग लोकांचा जीव गेल्यावर लक्ष घालणार का असा सवाल उपस्थित करत या पुलाची लवकरात लवकर दागडुजी करावी. अन्यथा आम्ही आंदोलनाचे पाऊल उचलू. असा इशारा कॉम्रेड दिलीप परचाके यांनी दिला.
लिंकवर क्लिक करून पाहा हा थरारक विडीओ…..