धारदार शस्त्रासह धुमाकूळ घालणाऱ्या युवकास अटक

वणीतील रंगनाथ नगर येथे चालला थरार

जितेंद्र कोठारी, वणी: लोखंडी धारदार शस्त्र हातात घेऊन धुमाकूळ घालत असताना एका युवकाला वणी पोलिसांनी अटक केली आहे. मो. समीर मो. गनी (20) असे अटक करण्यात आलेले युवकाचे नाव आहे. शहरातील रंगनाथ नगर भागातुन बुधवारी सायंकाळी 6.30 दरम्यान त्याला ताब्यात घेण्यात आली.

बुधवार 5 जाने. रोजी शहर पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना रंगनाथ नगर परिसरात एक युवक हातात धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून पोलीस स्टाफ तात्काळ रंगनाथ नगर पोहचले असता राजू झिलपे यांच्या घराजवळ सार्वजनिक ठिकाणी एक युवक धारदार गुप्ती घेऊन धुमाकूळ घालत असल्याचे दिसून आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

स्टाफच्या मदतीने सदर युवकाला ताब्यात घेऊन त्याच्या कडून धारदार गुप्ती जप्त करण्यात आली. आरोपी मो. समीर मो. गनी (20) रा. खरबडा मोहल्ला वणी विरुद्द कलम 4/25 आर्म ऍक्ट सहकलम बी.पी. ऍक्ट अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात व पोनि शाम सोनटक्के यांच्या आदेशानुसार स.फौ. सुदर्शन वानोळे, अशोक टेकाडे, हरींदर भारती, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली.

Comments are closed.