श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था संचालक मंडळ निवडणूक 26 जूनला

36 हजार मतदार ठरविणार पुढील संचालक

जितेंद्र कोठारी, वणी : सहकार क्षेत्रात नावाजलेली व प्रतिष्ठित श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या 17 सदस्यीय संचालक मंडळ निवडीसाठी रविवार 26 जून रोजी निवडणूक होणार आहे. संस्थेच्या 55 हजार खातेधारकांपैकी 36 हजार मतदार या निवडणुकीत मतदानाचे अधिकार बजावणार आहे. पतसंस्थेच्या यंदाच्या निवडणुकीत चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा आहे.

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची शहरी व ग्रामीण भागात 15 शाखा कार्यरत आहे. तब्बल 800 कोटींची ठेवी असणाऱ्या या पतसंस्थेवर ताबा मिळविण्यासाठी राजकीय क्षेत्रातील मातब्बरानी निवडणुकीत उडी घेतली आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्वात जय सहकार पॅनल व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहे.

पतसंस्थेच्या 17 संचालकासाठी सर्वसाधारण गटातून 12, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग राखीव 1, इतर मागासवर्गीय राखीव 1, अनुसूचित जाती जमाती राखीव 1 व महिला राखीव मतदार संघातून 2 संचालकाची निवड होणार आहे.

दोन्ही पॅनल काँग्रेस पक्षाचेच …!
श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था निवडणूक रिंगणात जय सहकार पॅनल हा विद्यमान अध्यक्ष व कांग्रेस नेता ऍड. देविदास काळे यांचा आहे तर परिवर्तन पॅनल कांग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांचा आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असे चित्र दिसत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.